Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे

दादा भुसे यांच्या उपस्थितीत कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

Sampat Devgire

नाशिक : केंद्र (Centre) आणि राज्य सरकारतर्फे (State Government) शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते, पण शेतमालाला भाव मिळत नाही. म्हणूनच समाजातील सर्व घटकांनी शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज येथे केले. (Guardian minister Dada Bhuse appeal society for farmers)

ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्सतर्फे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि कृषी उद्योगावर आधारित ‘कृषिथॉन' प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी श्री. भुसे बोलत होते.

श्री. भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान विकसित होत आहे. तंत्रज्ञानाचा प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांना परिसंवादाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येत आहेत. शेती क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून ड्रोनद्वारे फवारणी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ व इतर आपत्तीप्रसंगी उपग्रहाच्या माध्यमातून मदत देण्याची नियोजन करण्यात येत आहे. प्रदर्शनात सहभागी कंपन्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रयोग यशस्वी करून दाखवावे. सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शिवाय कृषी कंपन्यांनी गाव दत्तक घेऊन आपले प्रयोग यशस्वी करून दाखवल्यास तो एक पथदर्शक आणि मार्गदर्शक प्रकल्प ठरेल.

पीकविम्यासाठी बीड मॉडेल

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनासाठी बीड मॉडेल राबविण्यात येणार आहे, असे सांगत श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. गोडसे यांनी देशातील एकुण कृषी प्रदर्शनांपैकी तिसरे आणि राज्यातील दुसरे मोठे ‘कृषिथॉन' प्रदर्शन असल्याचे सांगितले. शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय कसे वाढवावेत, कमी शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. तराई यांनी शेतकऱ्यांना बँकेतर्फे सर्वोतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले.

यावेळी खासदार हेमंत गोडस, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, नाशिक अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाना पाटील, पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई, प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, मीडिया एक्झिबिटर्सचे संचालक नितीन मराठे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT