Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil News: ‘उभारी’साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करा!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत वाटप

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब असह्य होते. विशेषत: शेतकरी (Farmers) बांधवांच्या कुटुंबीयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटुंबांच्या ‘उभारी’साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशा कुटुंबांच्या पाठीशी शासन (Maharashtra Government) व प्रशासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. (Government will give all support to farmers families)

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृहात देण्यात आला. पशुहानी झालेल्या सहा व्यक्तींना शासकीय अर्थसहाय्यही देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालयातील कर्मचारी नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल) (रा. शिरसोली) यांचा कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने २८ मार्च २०२१ ला मृत्यू झाला होता. पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. आठवड्याभरात (कै.) नाना वाघ यांच्या नामनिर्देशित वारसास ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे.

तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, उप जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, दूध संघ संचालक रमेश पाटील, नंदलाल पाटील, अर्जुन पाटील, जना आप्पा कोळी, शिवराज पाटील, रवी कापडणे, सचिन पवार, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, महसूल सहाय्यक जयश्री मराठे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT