धक्कादायक...पुण्याच्या महिलेची मंत्रालयात आत्महत्या!

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; मुनोत याच्यासह एमआयडीसी कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Mantralay
MantralaySarkarnama
Published on
Updated on

धुळे : येथील (Dhule) अवधान शिवारातील एमआयडीसी (MIDC) परिसरातील पतीच्या नावे असलेला प्लॉट एकाने बनावट कागदपत्रांद्वारे स्वतःच्या नावावर करत बळकावला. या प्रकरणात न्याय न मिळाल्याने विधवा महिलेने (Women) मुंबईमधील (Mumbai) मंत्रालयात विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. (deceit Widow suicied in Mantralay Mumbai)

Mantralay
Jayant Patil's Statement: भाजपमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पराभव करण्याचे सामर्थ्य नाही

सध्या पुणे येथे राहण्याऱ्या या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांच्या पतीचा भुखंड धुळे येथे आहे. मात्र तो बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतर करण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. त्याबाबत त्या सातत्याने न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा करीत होत्या. त्यासाठीच त्या मंत्रालयात गेल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

Mantralay
Malegaon News; संजय राऊत मालेगावला, दादा भुसे काही दिसेना!

शीतल रवींद्र गादेकर (रा. लक्ष्मी हॉटेल, प्लॉट न. १६, एमआयडीसी, धुळे, ह. मु. पुणे) या महिलेचे पती रवींद्र गादेकर यांच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट न. १६ आहे. हा प्लॉट नरेशकुमार माणकचंद मुणोत याने बोगस नोटरी करत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून जबरदस्तीने हडपला असल्याची तक्रार शीतल गादेकर यांनी येथील पोलिस अधीक्षकांसह मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांकडे आणि मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रादेशिक एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली होती.

ही तक्रार गादेकर यांनी २१ मार्च २०२३ ला केली असली तरीही २०२० पासून शीतल गादेकर या सतत त्यांनी केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करीत होत्या. मात्र, तरीही त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने त्यांनी २७ मार्चला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी २७ मार्चला मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर शीतल गादेकर यांचा २८ मार्चला मृत्यू झाल्याची माहिती धुळे पोलिसांना प्राप्त झाली.

Mantralay
Nashik APMC News : राष्ट्रवादीच्या स्वतंत्र मोर्चेबांधणीने महाविकास आघाडीबाबत संभ्रम!

गेल्या तीन वर्षापासून धुळे एमआयडीसीमधील प्लॉटची मालकी मिळण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या शीतल गादेकर यांना जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याचा संतप्त सूर उमटत आहे.

दरम्यान, मुंबईत शवविच्छेदनानंतर शीतल गादेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. यानंतर धुळे येथे गतिमान हालचाली सुरु झाल्या. रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित मुनोत व एमआयडीसी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील येथे तातडीने दाखल झाले.

Mantralay
Jayant Patil's Statement: विधानसभेच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात!

धुळे जिल्ह्यातील दुसरी घटना

विकास प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनीही मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळीही राज्यात भाजप- शिवसेनेचे युती सरकार होते. आता शीतल गादेकर यांनीही मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com