Police issueing notice BJP leaders.
Police issueing notice BJP leaders. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पोलिसांच्या नोटीसने मावळते महापौर सतीश कुलकर्णी संतापले!

Sampat Devgire

नाशिक : महापालिकेतील (NMC) सत्ता संपता संपता भाजपने (BJP) काल दोन कार्यक्रमांचे भूमीपुजन केले. मात्र या विनापरवनगी कार्यक्रमांतच पोलिसांनी त्यांची कानउघडनी केली. नोटीसही बजावली. ही नोटीस बजावण्यासाठी अक्षरशः पोलिस मागे मागे ती टाळण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) व भाजप नेते पुढे पुढे अशी अजब स्थिती पहायला मिळाली. (Nashik police issued notice to mayor satish Kulkarni)

दरम्यान याबाबत भाजपचे मावळते महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच संतापले आहे. काल सुरवातीला भद्रकाली पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर पंचवटी पोलिसांनीही त्यांना नोटीस बजावली. त्यामुळे महापौर तसेच भाजपचे आमदार व पदाधिकारी चांगलेच संतापले.

नमामि गोदा हा केंद्र सरकार व नाशिक महापालिकेचा संयुक्त प्रकल्प असून, त्यासाठी केंद्र सरकारने ६७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरीही दिली आहे. त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यासाठी शुक्रवारी रीतसर अर्जही दिला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाची अडवणूक चुकीची आहे, असे मत महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पोलिसांनी कार्यक्रमाची रीतसर परवानगी न घेतल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची, तसेच काही जणांना नोटिसा देण्याची तयारी सुरू केली. त्या वेळी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह शहरातील तिन्ही आमदार, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. काही वेळाने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते परतल्यावर पोलिसांनी भाजप कार्यालय गाठत संबंधितांना नोटिसा देण्याची तयारी केली. त्या वेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी रीतसर अर्ज दिल्याचे सांगत नोटीस घेण्यास नकार दिला.

महापौरपद संविधानिक असून, हे दोन्ही प्रकल्प केंद्र सरकार व महापालिकेच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. मात्र, रीतसर अर्ज देऊनही अशी अडवणूक योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आपल्याला दिलेली नोटीस आपण स्वीकारलेली नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी नोटीस काढल्याचे सांगितले.

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीविरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षात दिवसेंदिवस संघर्ष टोकाला पोचत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये नमामी गोदा प्रकल्पाचे भूमिपूजनानंतर पोलिसांनी महापौर सतीश कुलकर्णी व शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली.

आयोजक म्हणून महापौर सतीश कुलकर्णी व शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, पोलिसांनी तिघी आमदारांच्या भूमिकेला न जुमानता नोटीस बजावल्याने प्रथम नागरिक महापौर कुलकर्णी यांचा कारकिर्दीतील शेवटचा दिवस वादाने समाप्त झाला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT