केंद्राच्या नावाने बोंबा मारणे; हा राज्य सरकारचा एककलमी कार्यक्रम

मालेगाव येथील मेळाव्यात केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारवर टिका केली.
Dr Bharti Pawar
Dr Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : राज्य शासन (Maharashtra Government) दिशाहीन झाले आहे. केंद्र शासनाकडून (Centre Government) योग्य तो निधी मिळूनही निधी वापरता येत नाही. जनहित व विकासकामे सोडून सगळ खापर केंद्राच्या माथी फोडणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. आघाडीच्या नेत्यांचे मन आणि खुर्ची सांभाळण्यात ते व्यस्त आहेत. असा आरोप केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी येथे केला.

Dr Bharti Pawar
आमदार कुणाल पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी मिळवले ३६ कोटी

येथील शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपचे युवानेते अद्वय हिरे होते. श्रीमती पवार म्हणाल्या, की ‘हर घर जल- घर घर नल’ या केंद्राच्या पाणीपुरवठा योजनेचा सर्वांना लाभ मिळावा, यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रस्ताव सादर करावे. ऊर्जा विभागाच्या गलथानपणामुळे शेतकऱ्यांना वीज मिळेत नाही. रडण्यापलिकडे शासन काही करत नाही. कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याकडे खास लक्ष दिले होते. रेशन, व्हॅक्सीन, बियाणे, खाद्य या सर्वांचा सुरळीत पुरवठा सुरु होता. शासनाला नियोजन करता न आल्याने केंद्राच्या नावाने बोंबा मारुन ते मोकळे होतात.

Dr Bharti Pawar
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गावे सक्षम करू!

यावेळी श्री. हिरे म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर नापास झाले आहे. तालुक्यात आगामी सर्व निवडणुकांत ‘शत प्रतिशत भाजप’ आणण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. येथील काही शासकीय, प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचे हातचे बाहुले झाले आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, खाद्य नाही. पिक विम्याचे पैसे नाहीत. देशातील ९ सर्वात मोठे कत्तलखाने येथे सुरु झाले. आगामी काळात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते होतील. कारण, काहींनी काँक्रिट प्लान्ट सुरु केला. त्यातच त्यांचा उद्देश लक्षात येतो. कामांची बोंब असल्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान सुरु आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य गणेश खैरनार, लकी खैरनार, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मनपा गटनेते सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष निलेश कचवे, पवन ठाकरे, दीपक देसले, संदीप पाटील, काशीनाथ पवार, दगा निकम, सुनील बच्छाव, केदा आहेर, संजय निकम, शहराध्यक्ष मदन गायकवाड आदी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com