Chhagan Bhujbal & Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Nashik News : प्राजक्त तनपुरे घेणार छगन भुजबळांची जागा!

Sampat Devgire

Prajakt Tanpure will be New NCP leader : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होताच, अनेकांना नाशिकच्या नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना नाशिकचे प्रभारी नियुक्त केले आहे. (NCP Sharad Pawar Group`s new leader for nashik is Tanpure)

नाशिकच्या (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रभारी म्हणून प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी जाहीर केलेला आजचा दौरा अचानक रद्द केल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकखांबी नेतृत्व होते. नियुक्त्यांपासून तर संघटनात्मक कार्यक्रम आणि काहीही करायचे असेल तर त्यांच्या परवानगीशिवाय पानही हालत नव्हते. त्यात अनेकांची गैरसोय होत होती.

याबाबत अनेकांची गौरसोय होत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेदेखील दाद लागत नसे. वरीष्ठांकडून सहानुभूतीशिवाय काहीच पदरात पडत नव्हते. बदललेल्या राजकीय स्थितीत भुजबळ अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये मंत्री झाले. त्यामुळे नाशिकचे नवे नेतृत्व कोणाकडे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात नाशिक तसेच प्रदेशच्या काही नेत्यांनाही रस असल्याने हालचाली सुरू झाल्याचे बोलले जाते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) पक्षाकडून नाशिक जिल्ह्याचे प्रभारीपद माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले आहे. तनपुरे आज नाशिक दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षाने तनपुरेवर टाकली आहे. त्यामुळे या नियुक्तीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

आता पुढील आठवड्यात तनपुरे यांचा दौरा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी राजकीय आढावा तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT