Contract Labour News: कंत्राटीकरणाविरोधात दोन हजार संघटना राज्य सरकारच्या विरोधात मैदानात!

Whether government wants Bonded labour system in the state- आंदोलनाला परवानगी नाकारल्याने नेत्यांनी कंत्राटीकरणाचा शासन आदेश फाडून निषेध केला
Delegation on against Contract labour
Delegation on against Contract labourSarkarnama
Published on
Updated on

Agitation against contract employment : राज्यभरात नऊ कंपन्यांद्वारे कंत्राटीकरणाने नोकर भरती करण्याचा निर्णय म्हणजे भावी पिढीला वेठबिगारीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने भाजप आणि एकनाथ शिंदे सुधारणांचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न करीत आहे. (employee & workers action committee protest against state government in Nashik)

नाशिक (Nashik) येथे राज्य शासनाच्या (Maharashtra Government) कंत्राटी कामगार भरतीच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाचा अध्यादेश फाडण्यात आला. सरकारविरोधात घोषणा (BJP) देण्यात आल्या.

Delegation on against Contract labour
Niphad Political News: दिलीप बनकरांचा करेक्ट कार्यक्रम होणार?, अनिल कदम आणि शरद पवार दिल्लीत भेट!

या वेळी पोलिस प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारल्याने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. शासनाच्या निर्णयाविरोधात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे कंत्राटी भरतीचा शासन आदेश फाडून या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

आयटकचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, सचिव दत्तू तुपे, राजेंद्र जाधव, महेश चौधरी, नामदेव बोराडे, विठ्ठल घुले, मीना आढाव, एस. आर. खातीब आणि भीमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना निवेदन देण्यात आले.

राज्य शासनाच्या ६ सप्टेंबरच्या निर्णयाविरोधात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या सर्व घटक संघटनांनी राज्यभर निषेध आंदोलन आणि निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला होता. राज्यभरातील दोन हजारांपेक्षा जास्त संघटनांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

सर्व राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या कंत्राटीकरणाच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. जे पक्ष कंत्राटीकरणाला पाठिंबा देतील, त्यांचा येत्या निवडणुकीत पराभव करण्यात येईल, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.

Delegation on against Contract labour
NDCC News : राष्ट्रवादीच्या थकबाकीदार नेत्यांना पोलिस देताहेत संरक्षण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com