Neelam Gorhe Sarkaranam
उत्तर महाराष्ट्र

Neelam Gorhe News : 'आपल्या कामाचा परीघ वाढवावा'; नीलम गोऱ्हेंचा भुजबळांसह जरांगेंना सल्ला

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी गोऱ्हे अमळनेर येथे बोलत होत्या.

Arvind Jadhav

Neelam Gorhe At Marathi Sahitya Sammelan : 'मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलेला आहे. तो मंजूर होत नाही तोपर्यंत काम सुरूच राहील, असा इशारा देणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि आमरण उपोषणाच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या कामाचा परीघ वाढवावा, असा सल्ला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला. हा सल्ला देताना मराठा आरक्षणाचा मुद्दा सक्षमपणे हाताळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगत एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Neelam Gorhe News)

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) अमळनेर येथे आल्या होत्या. यावेळी मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी दोन्ही पक्षांना सबुरीचा सल्ला दिला. मराठा आरक्षण मागण्यांसाठी लाखो लोक आले असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना सामोरे जात प्रश्न सोडविला. असे पहिल्यांदा घडले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे त्यांनी सिद्ध केले.

जी हिंदुत्ववादी जनता काठावर होती, तीही यानिमित्ताने आमच्याकडे झुकल्याचा दावा गोऱ्हे यांनी केला. या आंदोलनात मनोज जरांगे यांचे नेतृत्व मराठा समाजातून उभे राहिले आहे. त्यांनी आता ओबीसींचाही विचार करावा आणि छगन भुजबळ (Chhagan-Bhujbal) यांनीही ओबीसींसोबत एससी, एसटी अशा अन्य जातींचाही विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत भुजबळांसह जरांगे पाटील काय मत व्यक्त करतात, हे लवकरच समोर येईल. दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराबाबत मात्र गोऱ्हेंनी सावध भुमिका घेत प्रतिक्रिया दिली. (Neelam Gorhe At Marathi Sahitya Sammelan)

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पुणे विद्यापीठाबाबत पत्रकारांनी विचारले असता या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. विद्यापीठातील कार्यक्रम बंद पाडणे योग्य नाही. मात्र, मुद्दाम कोणी विडंबना केली असेल तर ते ही पाहायला हवे, अशी प्रतिक्रिया सुद्धा गोऱ्हे यांनी दिली.

Edited by : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT