Chhagan Bhujbal : झिरवाळांचे लोटांगण तर भुजबळांनी नेमका कोणता दिला आशीर्वाद !

Poitical News : मराठा आरक्षण, ओबीसी हक्क आणि मंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि भाजपशी वाढलेली सलगी या कारणांमुळे फोकस आपसुकच मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सरकला आहे.
chhagn bhujbal narhari zirwal
chhagn bhujbal narhari zirwalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मराठा आरक्षण, ओबीसी हक्क आणि मंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि भाजपशी वाढलेली सलगी या कारणांमुळे सध्या राज्याच्या राजकारणाचा फोकस आपसुकच मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सरकला आहे. राजकारणातील हाच धागा पकडून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी छगन भुजबळ यांचे लोटांगण घेत दर्शन घेतले. यावेळी भुजबळांनी नेमका काय आशीर्वाद दिला याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

श्रीमंत जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान, पुणे आयोजित वारकरी भक्तांचा मेळावा व सत्कार तसेच ‘अभंग पंचविशी’ प्रकाशन व ग्रंथदान सोहळा श्रद्धा लॉन्स नाशिक येथे पार पडला. या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी देखील हजर होते. कार्यक्रमस्थळी पोहचलेल्या झिरवाळ यांनी थेट कार्यक्रमाच्या सभामंडपात बसलेल्या मंत्री भुजबळ यांना गाठले अन वारकरी परंपरेनुसार लोटांगण घालून नमस्कार केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

chhagn bhujbal narhari zirwal
Shahaji Patil News : '..तर मी पुन्हा उद्धवसेनेत जाण्यास तयार' ; शहाजी पाटलाचं मोठं विधान!

झिरवाळांनी नमस्कार केल्यानंतर टाळ्या वाजल्या त्यावेळी भुजबळांनाही हास्य लपवता आले नाही. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ राजकारणात केंद्रस्थानी आहेत. पक्षाला आव्हान देताना आता आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीस सुरूवात झाली त्यावेळी भुजबळांनी विरोध केला. मात्र, त्यावेळी आपल्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी असल्याचे भान त्यांनी ठेवले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा आवाज बुलंद होत गेला.

जरांगे यांच्याकडून येणाऱ्या मागण्यांसाठी भाजपही अनुकूल नव्हते. मात्र, थेट विरोध करून रोष पत्कारून घेण्याची तयारी भाजपसह शिवसेनेची आणि अजित पवार गटाचीही नव्हती. अजित पवार गटाची आणि पर्यायाने छगन भुजबळांची यामुळे चांगलीच पंचाईत झाली. मनोज जरांगे यांना थेट उत्तर देणे आणि भाजपाचा ओबीसी चेहरा शाबूत ठेवणे यासाठी भाजपला छगन भुजबळ यांच्यासारखा चांगला पर्याय गवसला.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

भाजप आणि मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून एक एक पाऊल पुढे टाकण्यात आले. याचमुळे भुजबळांचा उत्साह सुद्धा वाढला. आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री छगन भुजबळ ईडी प्रकरणामुळे काहीसे शांत झाले होते. त्यांची आक्रमक शैली कोठेतरी लोप पावली होती. भुजबळांचे राजकारणातील स्थान काय? असा प्रश्नही त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र, आरक्षणाचा मुद्दा पुढे आला अन भुजबळांनी ग्रीप पकडली. महायुतीकडूनच अडचण होतच होती. मात्र, आता भाजपची स्वतंत्र साथ भुजबळांना मिळते आहे. त्याचमुळे की काय पण भुजबळ पूर्वीच्याच आक्रमक देहबोलीसह मैदानात उतरलेत.

पक्ष आणि आरक्षण मुद्दा या सर्वांना पुरून उरणार आणि मंत्रीमंडळातही राहणार असा भुजबळांचा विश्वास आहे. अगदी दोन वर्षांपूर्वी संपले अशी चर्चा अन तेथून थेट राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी पोहचलेल्या भुजबळांना म्हणूनच नरहरी झिरवाळांनी (Narhari zirwal) नमस्कार केला असावा, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

chhagn bhujbal narhari zirwal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल; म्हणाले, "माझा राजीनामा..."

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com