राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पक्षातील अनेकांनी त्यांना पाठिंबा देत त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. यानंतर पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना साथ दिली त्यांच्यावर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) कारवाईचा बडगा उगारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) राज्यातील तब्बल 21 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दोन बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी आज (ता.18 जुलै) याबाबतचे आदेश काढून जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष अशा पदांवर असलेल्या तब्बल 21 पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई केली.
अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते आणि शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे या दोन आमदार संग्राम जगताप समर्थक पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. विधाते आणि खोसे हे आमदार संग्राम जगताप यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून संग्राम जगताप यांच्यासोबत असलेल्या या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये विविध पदे देण्यात आलेली आहेत. शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षातर्फे विविध आंदोलने मोर्चे या नेत्यांच्या माध्यमातून केली गेली आहेत.
संग्राम जगताप यांच्यासह नगर शहरातील जवळपास सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ आल्यानंतर काही मोजक्या कार्यकर्त्यांनी दोन्ही गटाशी जवळीक ठेवत भविष्यात भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.