NDA Meeting In Delhi : 'एनडीए'च्या बैठकीत शिंदे-पवारांना मानाचे पान ; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत

BJP Political News : आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजपकडून एनडीएतील घटक पक्षांची बैठक बोलावली आहे.
NDA Meeting
NDA MeetingSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोदींच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले असून पाटण्यानंतर बेंगळूरु येथे दुसरी बैठक देखील घेतली आहे. याचवेळी भाजपकडून मंगळवारी(ता.१८) दिल्लीत 'एनडीए'ची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर पक्षांचे देखील नेते गेले आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे व अजित पवारांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे.

भाजपकडून बोलावण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)बैठकीत एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या रांगेतच आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यामध्ये तर अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसलेले दिसत आहे.

NDA Meeting
NDA Meeting : भाजपचा जानकर, खोतांना धक्का; NDAच्या बैठकीचे निमंत्रण नाही, जानकर म्हणाले, ‘मी भीक मागणार नाही...’

आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजपकडून एनडीएतील घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचं 38 पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी 24 पक्षांचा लोकसभेत एकही खासदार नाही. तर 7 पक्षांचे प्रत्येकी प्रत्येकी 1 खासदार आणि उर्वरित दोन पक्षांचे 2 खासदार बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत प्रत्येकाला बोलण्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बेंगळूरु येथे तर अजित पवार यांनी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थिती लावली. दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बैठकींना लावलेल्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

NDA Meeting
Ajit Pawar News : पुन्हा सत्तेत आलेल्या अजित पवारांचा वाढदिवस होणार जोमात ; आठवडाभर चालणार 'अजितोत्सव'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) या बैठकीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या एकूण 45 जागा निवडून आणणार असल्याचं सांगितलं आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही एकत्र असू असं अजित पवार या बैठकीत म्हणाले. लोकसभेच्या एकूण 48 पैकी 45 जागांवर जिंकण्याचा निर्धारही शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले...?

दिल्लीतील एनडीएच्या बैठकीअगोदर एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांमध्ये एकमत नाही. काँग्रेसने जेवढं काम मागील ५०-६० वर्षात केलं नाही, तेवढं मोदींनी ९ वर्षात केलं आहे. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपा-शिवसेना युतीबरोबर आले आहेत. त्यामुळे आता महायुती झाली आहे. परिस्थिती आता बदलली आहे. सरकार अगदी मजबूत झालं आहे. ही एका विचाराची युती आहे. विरोधक सगळे एकत्र येऊनही त्यांना एक नेता निवडता आलेला नाही. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे असल्याचंही शिंदे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com