Nashik Viral Video Ashok Kharat Falls Silent Before Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Viral Video: ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, अशोक खरात बडबड करत सुटला! मोठमोठ्या गप्पा मारणारा 'कॅप्टन' पोलिसी खाक्यासमोर गार! (Video)

Ashok Kharat Viral Video Nashik Police Action: बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेला, थयथयाट करणारा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर त्याचं चालणं देखील मुश्किल झालं होतं.

Pradeep Pendhare

Ashok Kharat viral clip: भोंदूगिरीतून महिलांचे शोषण करणारा, बलात्काराच्या गुन्ह्यात रिमांडमध्ये असलेला, भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आहे. त्याचा वाकून चालताना अन् 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला', म्हणणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

'पोलिसांवर कोप होण्याऐवजी, खरातवरच कोप झाला आहे', 'स्वतःच्या भविष्याचा अंदाज कसा वर्तवता आला नाही', 'कॅमेऱ्यासमोर नाटक करतो आहे', 'अशा व्हिडिओतून पोलिस नाकार्तेपणा झाकण्याचा प्रयत्न करत आहेत', 'पोलिसांना हप्ता दिला नाही म्हणून असं होतं' आणि 'याचा अक्षय शिंदे होता कामा नये', अशा प्रतिक्रिया व्हायरल झालेल्या व्हिडिओखाली आहेत.

नाशिक (Nashik) इथला भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याला 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. यात सुरवातीला अशोक खरात पोलिसांसमोर थयथयाट करत होता. याशिवाय अशोक खरात याच्या राजकीय संबंधामुळे राज्यात राजकीय आरोपांचा धुरळा उडला आहे.

पोलिसांनी (Police) अशोक खरात याच्याकडे उलट तपासणी सुरू केल्यानंतर, संतापला होता. थयथयाट सुरू केला होता. डोळे मोठे करून अन् थरथर कापत, तो मोठ्या आवाजात "घोर अपराध.. घोर अपराध.." असे कोठडीत ओरडायचा. खरात याच्या या प्रकारामुळे पोलिस कोठडीबाहेर बंदोबस्तावर असलेले पोलिस देखील घाबरायचे.

परंतु, यातच अशोक खराताच्या शोषणाला बळी पडलेल्या महिलांनी पुढे येत तक्रारी दिल्यानंतर, त्याच्या अडचणी वाढल्या. पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने, आता तपासात वेग घेतला आहे. यातच पोलिसांनी खरात याला तडाखा दिल्याचे बोलले जात आहे. हा तडाखा चांगलाच असून, खरात याला घाम फुटलेला आहे.

नाशिक जिल्हा कायद्याचा...

तो वाकून चालू लागला आहे. यातच तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, असे बडबडत सुटला आहे. तसा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडिओखाली तीव्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. या प्रतिक्रिया देखील चर्चेत आल्या आहेत.

प्रतिक्रियांचा पाऊस

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओखाली, 'याला लवकरात लवकर फाशी द्या', 'नाही तर बाकी बाबा सुधारणार नाहीत', 'हा माणूस फालतूपणा करत आहे', 'बायकांनी आपली सदसद्विवेकबुद्धी वापरावी', 'सगळं घडून गेलं आता पोलिस स्टंटबाजी करत आहेत', 'चेल्यांना कोडवर्ड देत आहे का, ते तपासा', अशा शेकडो प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT