Fake Baba : अशोक खरातवरून कालीचरण महाराजांचा संताप अन् हसत सुटले..; म्हणाले, 'भर चौकात डोक्यात...'

Kalicharan Maharaj reacts strongly in Dharashiv over the criminal case against Nashik-based fake godman Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर कालीचरण महाराज यांनी संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.
Kalicharan Maharaj
Kalicharan MaharajSarkarnama
Published on
Updated on

Kalicharan Maharaj statement : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, तपासात समोर आलेल्या राजकीय संपर्कावरून, राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

अशा भोंदूबाबांमुळे समाजाची, धर्माची, राजसत्तेची होत असलेल्या हानीवरून, कालीचरण महाराज चांगलेच संतापले आहे. "अशा भोंदूबाबा दोषी आढळल्यावर भर चौकात डोक्यात गोळी मारली पाहिजे. असे प्रकार उघडकीस आल्यावर त्यांना राजा आणि त्याची माणसं देखील पाहात नाहीत,' अशी प्रतिक्रिया नोंदवत, कालीचरण महाराज हसत सुटले.

नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कृत्यावरून, पहिली राजकीय विकेट पडली आहे ती, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर अशोक खरात याच्या राजकीय संबंधाचे फोटो, किस्से समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत.

विरोधकांना यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्य सरकारने एसआयटीची चौकशीची घोषणा केली आहे. चौकशी सुरू झाली असून, त्यात नेमकं काय उघडकीस येणार, याची उत्सुकता आहे. यातच हिंदू (Hindutva) धर्मप्रचारक कालीचरण महाराज यांची अशोक खरात प्रकरणावर संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे.

Kalicharan Maharaj
Ashok Kharat Viral Photo : ‘तो’ फोटो व्हायरल अन् विखेंनी हसत दिला ट्विस्ट; एकनाथ शिंदे काळातील किस्सा आला चर्चेत!

धर्म कार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नये....

कालीचरण महाराज म्हणाले, "बाजार सगळीकडे आहे. वकील, डाॅक्टर, मजूर पैसे घेतात, मग धर्माचं कार्य करणाऱ्यांनी पैसे नाही घेऊ, असा काही नियम आहे का? धर्माचं कार्य करणाऱ्यांना मानधन दिलं जातं. तो त्याचा दोष नाही. लोकांना ठगल्या गेल्यानंतर त्याचा दोष निर्माण होतो. जो ठगतो, तो नरकात जातो आणि जे ठगले जात आहेत, ते यातना भोगतच असतात." जे लोकं कुकर्म करणार आहेत, ते नरकात जाणार आहे. त्यांना शासकीय दंड देखील मिळणार आहे, राजाकडून!', असेही कालीचरण महाराज यांनी म्हटलं.

Kalicharan Maharaj
Vikhe Patil Controversy : मंत्री विखेंचा फोटो अन् खरात कनेक्शन; सपकाळांचा राजकीय ‘टायमिंग’ गेम!

धर्माच्या नावाखाली कुकर्म

'स्वयंघोषित कोणताच महाराज नाही, लोक त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की, मला महाराज म्हणा. सगळे महाराज लोकं, लोकांनी महाराज केले आहेत. लोकांनी पदावर बसवलं आहे. त्याच पदावरून धर्माच्या नावाखाली कुकर्म केलं जात असेल तर, ती लोकं निसंशय महापापी आहेत,' असाही दावा कालीचरण महाराज यांनी केला.

डोक्यात गोळी मारावी...

'अशोक खरात प्रकरणात जर ते दोषी होतात तर, त्यांना भर चौकात डोक्यात गोळी मारली पाहिजे. महिलांचं शोषण करणं म्हणजे, ते त्यांचे अलग-अलग प्रकारचं कुकर्म आहे. लैगिंग शोषण, बाल लैगिंग शोषण, समलिंग शोषण, पैशाची लूटपाट असो, खोट्यानाट्या गोष्टी असोत, भीती दाखवून लुटणे असो हे सर्व कुकर्मच आहे,' असे कालीचरण यांनी म्हटले.

...अन् महाराज हसत सुटले!

अशा लोकांना राजकीय आश्रय मिळतो यावर बोलताना, कालीचरण महाराज म्हणाले, "कोणत्या लोकांना राजकीय आश्रय मिळतो? ज्यांच्या मागे मोठ्याप्रमाणात पब्लिक आहे. तर राजा मंडळाला असं वाटत की, या साधू महाराजाच्या पायाला लागल्यावर त्याच्या मागील शिष्टमंडळ आपल्याला वोट करतील. प्रत्येक राजाची इच्छा असते की, आपल्याला वोट मिळावं. त्यातून हा प्रकार सुरू असतो." पण महाराज भ्रष्ट निघाल्यावर त्याच्याकडे कोणताही राजालोक पाहात नाही, असे म्हणत कालीचरण महाराज हसत सुटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com