Disgrace of Women Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shocking News; दशक्रीया विधीतच विधवा सुनेला काळे फासत काढली धिंड

समाजाला काळीमा फासणाऱ्या चांदवड तालुक्यातील या घटनेतील १३ महिलांविरुद्ध गुन्हा

Sampat Devgire

चांदवड : (Nashik) पुरोगामी महाराष्ट्राला (Maharashtra) काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात विधवा महिलेला (Affected Womens) तिच्या सासरच्या मंडळींनी तोंडाला (Police) काळं फासून गळ्यात चपलांचा हार घालत गावातून धिंड काढली. आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय या महिलेने व्यक्त केला आहे. (Famiy members blaim daughter in law for son`s suicide)

शिवरे (चांदवड) गावात दहा दिवसांपूर्वी संबंधित महिलेच्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला आहे, असा संशय या महिलेने दशक्रिया विधीच्या दिवशी उपस्थित केला. मात्र या महिलेमुळेच तिच्या पतीने आत्महत्या केली, असा तिच्या सासरच्या मंडळींनी आरोप केला आहे. दरम्यान, महिलेच्या पतीच्या आत्महत्याप्रकरणी सासूच्या तक्रारीवरून वडनेरभैरव पोलिसांनी संशयित म्हणून श्रावण गांगुर्डे (वय ३५, रा. शिवरे, ता. चांदवड) यास अटक केली असून, संशयित न्यायालयीन कोठडीत आहे.

ही महिला पतीच्या दशक्रियेसाठी आल्यानंतर तिच्यावरील त्यांचा राग अनावर झाला. यातूनच या महिलेला तिच्या सासरच्या मंडळीने तोंड काळं करून चपलांचा हार घातला आणि गावात तिची धिंड काढली. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच शिवरे येथे धाव घेतली. वडनेरभैरव पोलिसांनी नंदा अनिल कोते या विधवेच्या फिर्यादीवरून सासरच्या तेरा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दशक्रियाविधीसाठी नातेवाईकांसोबत गेले असता सासरच्या मंडळीने गळ्यात चपलाचा हार घालून शिवरे गावाच्या गल्लीबोळातून तोंडाला काळे फासून दिंडी काढली.

या तक्रारीनुसार वैशाली रवींद्र खानझोडे, अनिता भाऊराव सताळे, कल्पना पंडित गवळी, मीराबाई चिंधू सातळे, पूनम खंडू सताळे, ज्योती बाळू मोरे, मिरी जगन मोरे, मनीषा विष्णू गांगुर्डे, मंगल विष्णू पवार, मीराबाई भाऊसाहेब गांगुर्डे, सुनंदा नंदू सताळे (रा. शिवरे, ता. चांदवड), मीना गजाराम (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वागुळदा, ता. दिंडोरी) अशाबाई घोगर (रा. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT