Farmers in Mungsare protest against land acquisition linked to the Simhastha Kumbh Mela road project amid allegations of police action. sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Simhastha Kumbh Mela : अजब सरकारी कारभार; रात्री व्हाॅट्सअपवर नोटीस, पहाटे घरात घुसून लाठीमार! कुंभमेळ्याच्या रस्त्यासाठी कारवाई

Nashik Lathicharge News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामे सुरू आहेत. त्या कामांना नागरिकांचा विरोध वाढत आहे. सरकारी प्रशासनाचा तऱ्हेवाईक कारभार त्याचे कारण ठरत आहे.

Roshan More

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात बाह्य रिंग रोड केला जात आहे. या रस्त्यासाठी विविध गावात भूसंपादन केले जात आहे. यासाठी बळाचा वापर चर्चेचा विषय ठरला आहे. रस्त्याच्या भूसंपादनासाठी मुंगसरे येथे शेतकऱ्यांना चक्क सायंकाळी व्हाट्सअप वर मेसेज पाठविण्यात आला. सकाळी नागरिक झोपेत असतानाच घरात घुसून नागरिकांना बेघर केले.

मुंगसरे येथील नागरिकांना शुक्रवारी सायंकाळी व्हाट्सअप वर मेसेज पाठविण्यात आला. शनिवारी सकाळी साडेनऊला भूसंपादनाची कारवाई होणार असे त्यात नमूद होते. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी सशस्त्र बंदोबस्तात सकाळी सातलाच घरात शिरले.

यावेळी विरोध करणाऱ्या नागरिकांना बळाचा वापर करून दूर करण्यात आले. घरात घुसून महिलांवर लाठीमार झाला. रस्त्यासाठी येथील घरे रिकामी करण्यात आली. अगदी सकाळी गाव झोपेत असतानाच ही कारवाई झाली. घरात घुसून लाठीमार झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकाराने नागरिकांत संताप उसळला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण टाकण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात 66 किलोमीटर रस्त्यासाठी भूसंपादन वादाचा विषय ठरले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याची सुनावणी सोमवारी होणार होती. या सुनावणी आधीच महसूल विभागाने दडपशाही करून कारवाई केली.

पोलिसांची ही कारवाई न्यायालयीन सुनावणीच्या आधीच झाली. विविध गावांत राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध केला आहे. रिंग रोडचा मार्ग बदलावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मुंगसरे येथे घडलेल्या प्रकाराने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संदर्भात काही संघटनांनी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सावध भूमिका घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लाठीमार झाल्याचा इन्कार करीत पोलिसांकडून माहिती घेतली जाईल असे म्हटले आहे.

रिंग रोड काय आहे?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहराच्या सभोवताली रिंग रोड करण्यात येत आहे. 66 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या रस्त्यासाठी दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन, मखमलाबाद, ढकांबे, गौळाने, सारूळ, जलालपूर, महादेवपूर आणि विंचूर गवळी या गावातील जमिनी आणि काही घरे संपादित केली जाणार आहेत. या जमिनींना मोठी किंमत आहे. जमिनींमध्ये फळबागा असल्याने शेतकऱ्यांचा भूसंपादनास तीव्र विरोध आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT