Trimbakeshwar Temple Scam : त्र्यंबकेश्वर दर्शन रॅकेटचा मास्टरमाइंड कडलगला बसणार मोठा झटका, विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली

Trimbakeshwar Temple VIP darshan racket : कडलग हे आपल्या दोन पुतण्यांच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आता त्यांचे विश्वस्तपदावर गंडांतर येण्याची शक्यता असून धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
Purushottam Kadlag arrest
Purushottam Kadlag arrestSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणातील संशयित मास्टरमाइंड व मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केली होती. कडलग आपल्या दोन पुतण्यांच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

कडलग यांचे दोन्ही पुतणे एजंटकडून पैसे घ्यायचे आणि पुरुषोत्तम यांना फोन करून भाविकांच्या 'व्हीआयपी' दर्शनाची व्यवस्था करून द्यायचे. याप्रकरणात गेल्या २० दिवसांपासून कडलग कारागृहात आहेत. तपासादरम्यान त्यांच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रोकड सापडली आहे.

आता याप्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता असून विश्वस्त पुरुषोत्तम कडलग विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यांची विश्वस्तपदी नियुक्ती धर्मादाय उपआयुक्तांकडून झाली असल्याने हे पद रद्द करण्याचे अधिकारही त्यांनाच आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून ही प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. पुरुषोत्तम कडलग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याने राजकीय वर्तुळातही याप्रकरणाची मोठी चर्चा आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत न थांबता केवळ दहा मिनिटांत व्हीआयपी दर्शन करुन देण्याचे सांगत मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात येत होती. साधरण एका भाविकाकडून दोन ते तीन हजार रुपये घेतले जात होते. काही भाविकांकडून तर यापेक्षाही जास्त रक्कम उकळली जात. हा रेट साधरण दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत होता. अशाप्रकारे दररोज एजंटांमार्फत भाविकांकडून हजारो- लाखो रुपये उकळले जात होते. त्यामुळे कडलग यांच्या बॅंक खात्यात आढळलेली बहुतांश रक्कम देवस्थानातील काळ्या कमाईचीच असल्याचा दाट संशय एसआयटीला आहे.

Purushottam Kadlag arrest
Trimbakeshwar Darshan Pass Scam: त्रंबकेश्वर दर्शन पास घोटाळा! कडलक अटकेनंतर राजकारण तापलं! भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष तीव्र

विश्वस्त पुरुषोत्तम कडलग सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्याचे विश्वस्तपद रद्द करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाकडून 'सुओ-मोटो' कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणाचा तपास एसआयटी पथक करत असून पथकाने आतापर्यंत कडलग यांच्यासह त्यांचे दोन पुतणे आणि इतर ४ अशा एकूण ७ जणांना अटक केली आहे. आणखी दोन संशयित फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्तपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. पंरतु स्वत: विश्वस्तच अशा गैरप्रकारात सामील असल्याचे उघड झाल्याने देवस्थानची मोठी बदनामी झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आता धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विश्वस्त कडलग याला पदावरून हटवण्यासाठी आणि त्याचे विश्वस्तपद कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून 'सुओ-मोटो' कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. पोलिस प्रशासन, जिल्हा न्यायालय आणि SIT कडून धर्मादाय आयुक्तालयाकडे याबाबत गोपनीय माहिती सादर केली जाऊ शकते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

Purushottam Kadlag arrest
कुंभमेळा जवळ आला, त्र्यंबकेश्वर स्वच्छ करण्यासाठी साधू-महंत, अधिकारी सगळे लागले कामाला

कडलग यांच्या बँक खात्यातील १ कोटी १३ लाखांच्या रकमेबाबत एसआयटीने चौकशी केली. त्यावर कडलगने स्वतःच्या बचावासाठी रकमेचे वर्गीकरण केल्याचे तपासात समोर आले. हॉटेल व्यवसायातून २५ लाख रुपये, पिंपळगाव बसवंत लेबर कॉन्ट्रॅक्ट २४ लाख रुपये, जमीन खरेदी विक्री कमिशन 30 लाख, उर्वरित रक्कम वडिलोपार्जित शेत जमीनीतून आलेली व इतर दावा त्याने केला आहे. मात्र पोलिसांचा त्यावर विश्वास नसून यातील किमान ५० लाख रुपये VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून उकळले असल्याचा संशय असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस सर्व आर्थिक व्यवहारांचे मनी ट्रेल करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com