Farmers With Dr. Subhash Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule News; शेतकऱ्यांनी केली खासदार डॉ. सुभाष भामरेंची कोंडी?

वायदेबंदीप्रश्‍नी आवाज उठवा अन्यथा पुन्हा निवडून न जनतेला देण्याचे आवाहन करणार.

Sampat Devgire

धुळे : (Dhule) केंद्र शासनाच्या (Centre Government) आदेशावरून ‘सेबी’ने (Sebi) शेतीमालाच्या वायदे बाजारातील व्यवहारावरील बंदीला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. यात शेतकरी (Farmers) संकटात लाटला जाईल. खासदारसाहेब, शेतीमालावरील वायदेबंदी कायमस्वरूपी उठवावी, यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडा, अशी विनंती मतदारसंघातील शेतकऱ्यांनी भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांच्याकडे केली आहे. (Shetkari Sanghtana given memorandum to BJP MP Bhamre against Commodity market)

मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे खासदारांना आपल्या सरकारच्या निर्णयावर प्रशासनाकडे दाद मागावी लागणार आहे. ते खोरखर त्यात यशस्वी होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संसदेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा. केंद्र शासनाच्या आदेशावरून ‘सेबी’ने गहू, तांदूळ, मूग, चना, सोयाबीन, मोहरी व पामतेल या सात शेतीमालाच्या वायदे व्यवहारावरील बंदीला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे.

या निर्बंधांमुळे या सर्व शेतीमालाच्य किमती खालच्या पातळीवरच स्थिर राहिल्या आहेत‌. या केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ही बंदी उठवा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली.

राज्यातील प्रत्येक खासदाराला निवेदन देण्याची मोहीम शेतकरी संघटनेने सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत गंभीर प्रश्न असून महागाई वाढते आहे. सर्व वस्तूंचे दर गगणाला भिडले आहेत. मात्र केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकमालाच्या किमती कमी होत आहेत.

शेतीमाल व्यापारात सरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. २३ जानेवारीला स्वतंत्र भारत पार्टी व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील सेबी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात सात शेतीमालांवरील वायदेबंदी उठविण्यास दोन महिन्यांची मुदत दिली होती. आपण लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करून या सर्व शेतीमालावरील वायदेबंदी हटविण्याचा प्रयत्न करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

निवडून न देण्याचे आवाहन

२४ मार्च २०२३ पर्यंत केंद्राने व ‘सेबी’ने सात शेतीमालांवरील वायदेबंदी रद्द न केल्यास २७ मार्चला खासदार कार्यालयासमोर निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात येईल. यापुढे खासदार म्हणून निवडून देऊ नये, असे आवाहनही जनतेला करण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, पुरुषोत्तम देवरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी, जिल्हा संघटक नारायण माळी, संजय पाटील आदींनी निवेदनात दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT