Thackeray Vs Shinde : आयोगाच्या निर्णयाला आव्हान; पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणीची मागणी!

Shivsena News: निवडणूक आयुक्त तात्काळ बदला, ठाकरेंची मागणी
Thackeray Vs Shinde
Thackeray Vs Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यात विशेष बाब म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केलेल्या शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात येणार आहे.

Thackeray Vs Shinde
Ahmednagar News : '' निवडणूक आयोगाचा निर्णय दुर्दैवी; पण...''; आमदार गडाखांकडून राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट

शिवसेना निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रकरणावर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जाणार आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून ठाकरेंच्या या मागणीला विरोध केला जाणार आहे.

मात्र आयोगाचा निकाल वेगळे प्रकरण असल्यामुळे पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं मत शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात मांडले जाणार आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निकालाबाबतीलं प्रकरण सर्वोच्च न्यायालयातच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thackeray Vs Shinde
CM Eknath Shinde : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार पक्षप्रमुख !

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. आता ठाकरेंना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीच पाठींबा दिले असल्याचेदिसून येत आहे. निवडणूक आयुक्तांचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद असल्याचं भाजपचे नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामीं यांनी म्हटले होते. यामुळे या प्रकरणात आता भाजपला घरचा आहेर स्वामींनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com