Hoarding after cancel of SP Sachin Patil`s transfer  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एसपी`ची बदली रद्द होताच...नाशिकला झळकले फलक!

एसपी सचिन पाटील यांच्या बदलीला स्थगिती मिळताच बदलीला विरोध असलेल्या समर्थकांनी सटाणा तसेच अन्यत्र स्वागताचे फलक झळकवले.

Sampat Devgire

नाशिक : जिल्हा पोलिस अधीक्षक (SP) सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या बदलीला (Transfer) उच्च न्यायालयाने (High court) सोमवारी स्थगिती दिली. ही बातमी येताच त्यांच्या बदलीला विरोध असलेल्या समर्थकांनी (Oppose for Transfer) सटाणा (Satana) तसेच अन्यत्र फलक (Hoardings) लावले. त्यामुळे पहिल्यांदाच पोलिस एखादा अधिकारी अवघ्या वर्षभरात जनतेत लोकप्रिय (Popular) होऊ शकतो, याचा प्रत्यय आला.

SP Sachin Patil

एका विधान परिषद सदस्याने नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली करावी अशी मागणी आपल्या लेटरहेडवर केली होती. त्यानंतर अवघ्या वर्षभराचा कालावधी झालेला असताना एसपी सचिन पाटील यांची बदली झाली. या बदलीने नागरिक व विशेषतः शेतकरी नाराज झाले. त्यांनी या बदलीला विरोध केला. काही संघटनाही पुढे आल्या. त्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना देखील निवेदन देण्यात आले होते. श्री. भुजबळ जनतेच्या मागणीला काय प्रतिसाद देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र बदलीचा विषय गृह विभागाचा आहे. त्यात हस्तक्षेप करण्यास त्यांनी तयारी दाखवली नाही.

याविषयी सोशल मीडियावर शेतकरी, विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी या बदलीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागीतली होती. त्यासंदर्भात सोमवारी झालेल्या सुनावनीत न्यायालयाने गृह विभागाला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला नसताना बदली का झाली? असा प्रश्न केला होता. या प्रशासकीय बदलीविषयी त्यांनी स्पष्ट खुलासा देखील मागविला. ही माहिती मिळताच, शेतकऱ्यांनी त्याबाबत आनंद व्यक्त केला. त्याची प्रतिक्रीया म्हणून `काम करणाऱ्या हातांना न्याय द्या` असे फलक झळकले आहे. सोशल मीडियावर देखील अशा पोष्ट व्हायरल झाल्या आहेत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT