अन्यथा स्मार्ट सिटीची कामे बंद पाडू...

मोठा गाजावाजा करून शहरात स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटला जात आहे. या नावाखाली बाजारपेठेतील रस्व रस्ते अनेक दिवसांपासून खोदले आहेत.
NCP Youth wing given memorandum to Smart city
NCP Youth wing given memorandum to Smart citySarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मोठा गाजावाजा करून शहरात स्मार्ट सिटीचा (Smart city Projects) डांगोरा पिटला जात आहे. (Publicity) या नावाखाली बाजारपेठेतील (Markets) रस्व रस्ते (Road closed) अनेक दिवसांपासून खोदले आहेत. सणासुदीच्या (Festival seasons) दिवसात व्यापारी, दुकानदार व नागरिकांची ही अडवणूक थांबवा. रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, (Complete Road works soon) अन्यथा स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ (Otherwise project will be Stopped) दिले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी दिला आहे.

NCP Youth wing given memorandum to Smart city
खासदारच असुरक्षित... तिथे सामान्यांची काय कथा!

यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले. विकास कामांच्या नावाखाली शहरात खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत अन्यथा शहरात स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यावेळी दिला.

NCP Youth wing given memorandum to Smart city
इपरीतच घडले... एसपी सचिन पाटील यांची बदली थांबली

शहरातील जवळपास सर्व रस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत दुरुस्त केले जात आहेत. त्यात कुठेही नियोजन नाही. कामात सुसुत्रता नाही. अगदी बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोल व दुकाने उंचावर अशी स्थिती झाली आहे. स्मार्ट सिटी म्हणजे नाशिककरांचे पैसे खर्ची पाडून नाशिक शहराला उध्वस्त करणे असा होतो काय? असा प्रश्न त्यांनी केला. या कामात सुसुत्रता आणावी आणि सणासुदीच्या तोंडावर ही कामे पूर्ण करून महत्त्वाचे रस्ते नागिरकांसाठी खुले करावेत.

शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, बाळा निगळ, विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, निलेश भंदुरे, गणेश पवार, कल्पेश कांडेकर, नवराज रामराजे, किरण पानकर, राहुल पाठक, भालचंद्र भुजबळ, अथर्व खांदवे, तेजस शिंदे, ओमकार बेंद्रे, निरंजन पगार, दीपक कुलकर्णी, गणेश गरगटे, प्रणव पानकर, कुणाल घसते, बाळू फसटे, नीरज काळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com