MLA Rahul Dhikle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : मखमलाबादच्या शेतकऱ्यांसाठी आमदार राहुल ढिकले आले धाऊन!

Sampat Devgire

Nashik Politics : नाशिक शहरातील काही गावांमध्ये झालेल्या नगर भूमापन विभागाच्या जमीन मोजणीमध्ये असंख्य चुका झाल्या होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा कालावधी व आर्थिक झळ सोसावी लागणार होती. त्यामुळे या कार्यालयात खेट्या मारून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार राहुल ढिकले धावून आले. (Revenue Minister take notice of Makhmalabad Farmers issue and Solve it)

नाशिक (Nashik) शहरातील मखमलाबाद गावासह तीन ते चार गावातील शेतकऱ्यांना (Farmers) सिटी सर्वे खात्याच्या चुकांची झळ बसली होती. या प्रकरणात आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) यांनी महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (dr. Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे तक्रार केली होती.

आमदार ढिकले यांची कार्यपद्धती वेगळी आहे. ते तक्रार घेऊन आलेल्या नागरिकाचे समाधान होईपर्यंत पाठपुरावा करतात. ज्या विभागाकडे अथवा अधिकाऱ्याशी संबंधित विषय असेल, त्याकडे ते व्यक्तीश: जाऊन त्याबाबतची कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा करीत असल्याने त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलेल्यांचे समाधान होते. मखमलाबादच्या शेतकऱ्यांनाही तो अनुभव आला.

महापालिका हद्दीमध्ये नवीन सिटी सर्वे क्रमांक लागू करताना सातबारा उताऱ्यावर नोंद झाली खरी, मात्र पोटहिश्‍शाचे एकत्रीकरण करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात चुका झाल्या. त्या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाच्या महसूल विभागाच्या अवर सचिवांनी पुनर्निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला असून विहित कालावधीमध्ये प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे मखमलाबाद, म्हसरूळसह शहरातील गावठाणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

मखमलांमधील शेतकऱ्यांनी आमदार टिकले यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन चुका जागेवरच दुरुस्त कराव्यात अशी मागणी केली होती. मंत्र्यांनी संबंधितांना मोजणी तसेच नकाशांतील चुका दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते.

मात्र त्यासाठी शासन स्तरावर आदेश काढावा लागणार होता. तो आदेश मिळवण्यासाठी आमदार ढिकले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ते स्वतः त्यासाठी काढण्यात आला. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये झालेल्या दुरूस्तीने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला.

या त्रुटींची झळ सुमारे 22 गावांना बसली होती. या गावांसह गावठाणामध्ये भूमिअभिलेख विभागाने सिटी सर्वे क्रमांक (सीटीएस) लागू केला आहे. परंतु सिटी सर्वे क्रमांक लागू करताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या. पूर्वी असलेले सर्व पोटहिश्‍शांचे एकत्रीकरण करण्यात आले. पोटहिश्‍शांचे एकत्रीकरण करताना दोन ते तीन सर्वे क्रमांक एकत्र करण्यात आल्याने त्यात बांधाला बांध असलेल्या शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT