Farmer agitation Kumbh Mela land issue: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध रस्ते आणि प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात भूसंपादन केले जात आहे. या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
शहरातील रिंग रोडच्या भूसंपादनाला अत्यंत मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर आणि सरोज अहिरे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते.
यासंदर्भात नाशिक शहरातील शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारी हा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला. मात्र परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर हा मोर्चा अडवला.
मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन अधिकारी पवन दत्ता यांनी चर्चेला बोलावले. मात्र कार्यालयात गेल्यावर सभागृह उपलब्ध नसल्याने दारातच चर्चा करावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेने शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला.
शेतकऱ्यांनी चर्चा न करताच माघारी परतण्याचे ठरवले. भूसंपादन अधिकाऱ्यांनी आप्पानास्पद वागणूक दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी याबाबत अधिक प्रखर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.
आमदार सरोजा हिरे यांनी भूसंपादनाच्या विषयावर मंगळवारी लक्षवेधी मांडली होती. या चर्चेत आमदार सीमा हिरे यांनीही भाग घेतला. २२ गावातील तसेच शहरातील काही ठिकाणी रिंग रोड साठी भूसंपादन होणार आहे. या संदर्भात शासनाने मोबदला देताना फेरविचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित भूसंपादन अत्यावश्यक आहे. संदर्भात राज्य शासन शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेईल. संपादनाचा मोबदला देताना प्रकल्पामुळे कोणावरही अन्याय होऊ नये. जमिनी किंवा घरे बाधित होत असल्यास त्याला मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले होते.
मात्र त्याच वेळी आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना अडवण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करताना अधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुढे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.