Bangladesh Issue Malegaon: सोमय्यांवर भोसले ‘अस्त्र’! नोटीस धाडली, बनावट आरोपांचा ससेमिरा अंगलट येणार

Malegaon Bangladesh issue political controversy: किरीट सोमय्या यांनी जन्म दाखले रद्द झालेले बांगलादेशी, रोहिंग्या असल्याचे विधान भोवणार?
notice sent to Kirit Somaiya over allegations
notice sent to Kirit Somaiya over allegationsSarkarnama
Published on
Updated on

Bhosale warns Somaiya over allegations: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्मदाखले प्रकरण तापत ठेवले आहे. त्याचा मोठा फटका मालेगावच्या नागरिकांना बसला आहे. यासंदर्भात विविध गुन्हे दाखल आहेत.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहराचे विविध दौरे केले होते. या शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली होती.

पोलिसांच्या एसआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र चार हजार नागरिकांचे जन्म दाखले रद्द झाले. यामध्ये मालेगावचे माजी नगराध्यक्ष दीपक भोसले आणि विविध हिंदू नागरिकांचाही समावेश आहे.

notice sent to Kirit Somaiya over allegations
Economic package for Maharashtra: खासदार भास्कर भगरे यांची निर्मला सीतारमण यांच्याकडे धाव, नाशिकच्या या प्रकल्पांसाठी मागितले पॅकेज!

माजी खासदार सोमय्या यांनी मात्र या प्रकरणी राजकीय वातावरण पेटवण्यासाठी विविध आरोप केले. जन्म दाखले रद्द झालेले नागरिक अतिरेकी आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी बनावट जन्म दाखले घेतले. मालेगाव शहर हे अतिरेक्यांचे केंद्रस्थान आहे, असे सोमय्या म्हणाले होते.

notice sent to Kirit Somaiya over allegations
Rahuri By Election : राहुरीवर मुंबईत मोठं राजकीय मंथन! कर्डिले-मुख्यमंत्री भेटीत विखे-जगतापांची एंट्री

किरीट सोमय्या यांच्या या आरोपाने मालेगाव मध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या विरोधात माजी आमदार आसिफ शेख आणि महापौरांसह विविध नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासन देखील कात्रित सापडले आहे.

सोमय्या यांच्या आरोपाने दीपक भोसले हे व्यथित झाले आहेत. भोसले कुटुंबीय गेली ६३ वर्ष मालेगाव शहराच्या राजकारणात सक्रिय आहे. नगरसेवक दीपक भोसले यांनी याबाबत किरीट सोमय्या आणि महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

श्री सोमय्या यांच्या आरोपाने आपण व्यतिरिक्त झाले असून समाजातील प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे यासंदर्भात सोमय्या यांनी आरोप मागे घेत माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. आपण अतिरेकी आहोत हे विधान सोमय यांनी केल्याने समाजातील प्रतिमा मलीन झाल्याचा दावा या नोटीस मध्ये करण्यात आला आहे.

निमित्ताने ग्रेट सोमय्या यांना राज्यात पहिल्यांदाच मालेगाव मधून आव्हान मिळाले आहे. आंदोलनाबरोबरच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्धार भोसले यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com