BJP Politics : कांदा निर्यातबंदीने भाजपच्या विरोधकांना आयतेच राजकीय हत्यार हाती लागली आहे. मात्र या निर्णयावर भाजपमध्ये देखील विरोधाचे प्रतीध्वनी ऐकू येऊ लागले आहेत. धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच या निर्णयाला विरोध केला आहे. (Dhule BJP farmers cell leaders deemands to roll back Onion export banned)
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर महाराष्ट्रात (Maharashtra) विविध भागात भारतीय जनता पक्षावर (BJP) मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत सोमवारी चांदवड (Nashik) येथे आंदोलन झाले होते. मात्र ही टिका आता भाजपचे पदाधिकारीही करू लागले आहेत. त्यामुळे नेत्यांची चांगलीच कोंडी होत आहे.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी केली अन् कांद्याचे भाव अचानक कोसळले. कांद्याचे लिलाव बंद पडले आहेत. कांदा अधिक काळ टिकणारा नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी वर्गात खूप संतापाची लाट पसरलेली आहे. शेतकरीहिताच्या दृष्टीने त्वरित कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी आग्रहवजा मागणी भाजप कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे यांनी केल्याने भाजपला घरचाच आहेर दिला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष खलाणे यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना निर्यातबंदी उठविण्याबाबत आग्रही मागणी करणारे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की उत्तर महाराष्ट्रात कांदा हे बागायती मुख्य पीक आहे. कांद्याच्या अस्थिर भावामुळे शेतकरी कर्जबाजारी होणे नेहमीचेच आहे. आता चांगल्यापैकी भाव मिळत होते. अचानक निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे. ही बंदी उठविण्यासाठी खासदार डॉ. भामरे यांनी ठोस प्रयत्न करण्याची अपेक्षा निवेदनात केली आहे.
निवेदन देताना शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, भाजप पदाधिकारी भाऊसाहेब देसले, उत्कर्ष पाटील, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र पाटील, विकास पवार, मुकेश पवार, सखाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील, भिकन पाटील, प्रा. अशोक पाटील, भटू पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, जिजाबराव माळी यांसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.