Dhule Accident News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mumbai Agra Highway Accident : बुलडाण्यानंतर धुळ्यात भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

Mumbai-Agra Highway : तीन दिवसांपूर्वी बुलडाण्यामध्ये (Buldana) भीषण अपघात झाला होता.

सरकारनामा ब्यूरो

Dhule Accident News : तीन दिवसांपूर्वी बुलडाण्यामध्ये (Buldana) भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता धुळे (Dhule) जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 12 जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले, असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) शिरपूर तालुक्यातील पळासनेर गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येते. याच गावाजवळ दुपारी 12 वाजताच्या दरम्यान, ही घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना ब्रेक फेल झाला. तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. 15 ते 20 जण जखमी आहेत. अपघातस्थळी सध्या मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. अपघातात जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर वाहाने उभी होती. कंटेनर त्या वाहानांनाही धडकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT