NCP Political Crisis: ...अन् प्रफुल पटेलांचा फोटो कार्यालयाबाहेर फेकला; पवारांनी दिल्लीची जबाबदारी दिली 'या' विश्वासू नेत्याकडे

Delhi Office Responsibility on Sonia Doohan: राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गटात दावे-प्रतिदावे
Sonia Doohan, Praful Patel
Sonia Doohan, Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Vs Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (दि.२ जुलै) मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीत उभी फूट पडून विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांनीही बंडाला साथ दिली. यामुळे शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Political News)

या बंडानंतर शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान बंडानंतर पवार यांनी पक्षांतर्गत पुन्हा भाकरी फिरवण्यास सुरूवात केली आहे. शरद पवार यांनी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीची जबाबदारी पवारांनी आपल्या विश्वासू असलेल्या नेत्यांवर सोपवली आहे. त्याबाबत पत्र जारी केले आहे. तसेच पवार यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.

Sonia Doohan, Praful Patel
Maharashtra Political Crisis : अजित पवारांकडून जिल्हाध्यक्षांची जुळवाजुळव सुरू? कैलास पाटील नॉट रिचेबल..

दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी सोनिया दूहान यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. सोनिया दूहान या शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरुण फळीतील सोनिया या आश्वासक चेहरा मानला जातो. सोनिया या त्याच आहेत ज्यांनी राष्ट्रवादीत झालेल्या मागच्या बंडावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आताही बंड झाल्यानंतर त्या शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभ्या आहेत.

शरद पवार यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदाधिकाऱ्यांना हे सूचित केले जात आहे की की, नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या प्रमुख सोनिया दूहान या असतील." बंडानंतर झालेल्या नियुक्तीनंतर दूहान अॅक्शनमोडमध्ये आल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी दिल्ली कार्यालयातील प्रफुल पटेल यांचा फोटो बाहेर काढला. यातून त्यांनी बंड करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांबाबत आपला रोष व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Sonia Doohan, Praful Patel
Eknath Khadse News: जळगावमध्ये एकनाथ खडसेच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा?

दरम्यान, फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. शरद पवार यांनी प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर अजित पवार यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. तर शरद पवारांनी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी सोनिया दूहान यांच्याकडे सोपवली आहे. यावर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com