Dada Bhuse
Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse; पालकमंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करा!

Sampat Devgire

मालेगाव : बोरी -आंबेदरी (Malegaon) धरणाची पाटकॅनॉल चारी बंद करून पाइपलाइनने पाणी नेण्याचा घाट पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी घातला आहे. प्रकल्पबाधीत शेतकरी (Project affected Farmer) गणेश गंजीधर कचवे (Ganesh Kachave) यांनr आंदोलनस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt) करावा केला. या प्रकरणी पालकमंत्री भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती (SP Aniket Bharti) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (All Party delegation deemands to file FIR Against Dada Bhuse)

या भागातील शेतकऱ्यांचा सदर योजनेला सुरवातीपासून विरोध आहे. त्यासाठी यापूर्वी मोठे आंदोलन झाले होते. सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तो बिकट होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. याचीच परिणिती म्हणून ही मागणी करण्यात आली.

भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले. बोरी-आंबेदरी बंदिस्त पाइपलाइनला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आंदोलनकर्ते शेतकरी गणेश कचवे यांचा विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी पालकमंत्री श्री. भुसे यांनाच जबाबदार धरले आहे.

हा शेतकरी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. माजी मंत्री (स्व.) डॉ. बळिराम हिरे यांच्या कार्यकाळात बोरी-आंबेदरी धरण बांधले आहे. माजीमंत्री पुष्पाताई हिरे यांच्या कार्यकाळात या धरणाचा कॅनॉल तयार करून माळमाथ्यावरील कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. बोरी आंबेदरी बंदिस्त जलवाहिनीला शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायतींचा विरोध आहे. तसा ठराव करून संबंधित विभागाकडे यापूर्वीच सादर केलेले आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी २८ दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे. न्याय मिळत नसल्याने त्यांच्या भावना तीव्र आहेत. बंदिस्त जलवाहिनी योजनेस शिवसेना, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. सदरच्या पाइपलाइनमुळे परिसरातील चार ते पाच गांवामधील शेती कोरडवाहू होऊन शेतकरी हे शेतमजूर होतील. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील. त्याची जबाबदारी राज्य शासनाची राहील.

पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अद्वय हिरे, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, सुनील गायकवाड, निखिल पवार, राकेश भामरे, शेखर पगार, जितेंद्र देसले, भरत पाटील, भारत म्हसदे, अशोक आखाडे, नंदू सावंत, मदन गायकवाड, गुलाब पगारे, जयेश आहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT