Bharat Jodo Yatra : राहुल गांधीच्या यात्रेत सहभागी झाल्याने शिक्षकावर निलंबनाची कारवाई : काँग्रेसची टीका!

Bharat Jodo Yatra : यात्रेदरम्यान राहुल गांधींनी त्यांना मिठी मारली. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर त्यांना शेअर केले होते.
Bharat Jodo Yatra :
Bharat Jodo Yatra : Sarkarnama
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra : काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे मध्य प्रदेशातील एका शिक्षकावर कारवाई करण्यात आली. राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आहे. 24 नोव्हेंबर रोजी कुंझरी येथील शासकीय प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कन्नौजे हे तेथून निघालेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबतचा शिक्षकाचा फोटो व्हायरल होत आहे. समाजाचे प्रश्न अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर मांडत असल्याचे त्यांनी राहुल गांधींना सांगितले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी त्यांना मिठी मारली. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

Bharat Jodo Yatra :
Girish Bapat : खासदार गिरीश बापटांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय ?

या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागाने सांगितले :

रजेचा अर्ज केल्यानंतर या यात्रेत सहभागी होण्यासाठी गेल्याचे या शिक्षकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. शिक्षण विभागाने निलंबन पत्रात हे सरकारी नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. कन्नोज यांची तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

माहितीनुसार, आदिवासी कार्य विभागाचे सहाय्यक आयुक्त, नीलेश रघुवंशी यांनी कुंजरी येथील शासकीय प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कन्नौजे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. निलंबन कारणांमध्ये राजेश कन्नौजे यांचा 24 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह राजकीय रॅलीत, सहभागी होणे हे नागरी सेवा आचार नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगितले गेले आहे.

एनएस रघुवंशी, आदिवासी व्यवहार विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणाले, “राजेश कन्नोजे यांना सेवा वर्तन नियमांचे उल्लंघन आणि राजकीय रॅलीत भाग घेतल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या कामाचा दाखला देत त्यांनी रजा मागितली होती, मात्र एका राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहून, संबंधि फोटो सोशल मीडियावर टाकून, सेवा वर्तन नियमांचे उल्लंघन केले.

Bharat Jodo Yatra :
Smriti Irani : 'भारत जोडो' यात्रेचं नवीन नामकरण ? ; स्मृती इराणींनी उडवली कॉंग्रेसची खिल्ली

दरम्यान, राज्य काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "शिवराज सिंह चौहान सरकारने कर्मचाऱ्यांना आरएसएस शाखांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे, परंतु एका आदिवासी राजेश कन्नोजेला बिगर-राजकीय रॅलीत सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातून २३ नोव्हेंबरला निघालेली भारत जोडो यात्रा रविवारी राजस्थानमध्ये दाखल होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com