orruption in Education
orruption in Education Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Education: धक्कादायक: सात शिक्षकांनी केला १.२१ कोटींचा भ्रष्टाचार?

Sampat Devgire

धुळे : बनावट (Boguss) पद्धतीने विशेष शिक्षक (Teachers) म्हणून कार्यरत राहात शासनाची तब्बल १.२१ कोटी रूपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षासह जिल्ह्यातील सात विशेष शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपविण्यात आला आहे. (Police will investigate this fraud of teachers & Institute)

शिक्षकांकडूनच सरकारी तिजोरीला शेज लावण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. नाशिकचा शिक्षण विभाग यापूर्वीच शिक्षणाधिकाऱ्यांच्या गैरप्रकारांनी चर्चेत आला आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी जाहीरपणे `आम्ही या विभागात काम करतो, हे सागंण्याची लाज वाटते` असे विधान केले होते. त्यामुळे या प्रकाराने पुन्हा एकदा या विभागाच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र जोशी (वय ५८, रा. संभाप्पा कॉलनी, चितोड रोड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पंकज साळुंखे कायदेशीर लढाई लढत होते. येथील जय भवानी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शांताराम गोटू बेहरे, सोनगीर येथील एन. जी. बागूल हायस्कूलचे विशेष शिक्षक हेमराज रवींद्र पाटील, देवपूरमधील हाजी बबलू सरदार हायस्कूलचे विशेष शिक्षक उल्हास प्रकाश सूर्यवंशी, साक्री रोडवरील स्वामी टेऊराम हायस्कूलचे विशेष शिक्षक रणजित झुंबरलाल पाटील, अर्थे बुद्रूक (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विशेष शिक्षिका प्रतिभा दिनकर बेहरे, जखाणे (ता. शिंदखेडा) येथील विशेष शिक्षक संजय दिनकर बेहरे व जखाणेतील विद्यालयाचे विशेष शिक्षक अतुल संतोष मोरे यांनी २००९ पूर्वीच्या केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत पूर्व नियोजनातून इतरांच्या मदतीने बनावट दस्ताऐवजाच्या आधारे आजही शासनाच्या सेवेत बनावट पद्धतीने विशेष शिक्षक म्हणून कार्यरत राहून एकूण एक कोटी २१ लाख ५६ हजार ४१३ रुपये वेतन घेतले.

नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडील केवळ तीन विशेष शिक्षकांनी नाममात्र २ लाख १८२ रुपये परत केले. सर्व सहा विशेष शिक्षकांनी व जय भवानी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष/ मुख्याध्यापकाने मिळून शासनाची एकूण १ कोटी २१ लाख ५६ हजार ४१३ रुपयात फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी हेमंत बेंडाळे तपास करीत आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT