NCP: युवतीवर अत्याचार होऊनही महाराष्ट्रातील `ईडी` सरकार संवेदनाहीन!

धडगावच्या पिडीत युवतीच्या कुटुंबियांचा न्यायासाठी सर्वोतोपरी तयारी असल्याचे अॅड. महेश तपासे यांनी सांगितले.
NCP leader Adv. Mahesh Tapase
NCP leader Adv. Mahesh TapaseSarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार : राज्याचा (Maharashtra) आदिवासी विकास विभागाच्या (Trible Devolopment Minister) मंत्र्यांचा जिल्हा असूनही एका युवतीवर (Victim) अत्याचार करून ठार केले जाते. त्याच्या न्यायासाठी पीडित युवतीचे मृतदेह ४४ दिवस कुटुंबीय पुरून ठेवते, एवढी दुर्दैवी घटना घडूनही महाराष्ट्रातील इडी सरकारच्या संवेदना जाग्या झाल्या नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मात्र या पीडित युवतीचा कुटुंबीयांना न्याय मिळावा, म्हणून आंदोलन, मोर्चा, धरणे, सत्याग्रह, जे काही करावे लागेल ते राष्ट्रवादी काँग्रेस करेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (NCP Spoakerson Adv. Mahesh Tapase Criticise Dr Vijaykumar Gavit)

NCP leader Adv. Mahesh Tapase
जलपूजनावरून सुजित झावरेंची आजी-माजी आमदारांवर टीका

खडक्या (ता.धडगाव) येथील युवतीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. तरीही पोलिसात त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे आज (ता.१६) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

NCP leader Adv. Mahesh Tapase
शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार

ते म्हणाले, पीडित युवतीच्या कुटुंबीयांची विच्छेदन करण्याची मागणीसाठी तब्बल ४२ दिवस न्याय मागावा लागणे, हे दुर्दैव आहे. घटना धडगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील असल्याने एवढे दुर्लक्ष का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आम्ही बंड कसा यशस्वी केला, हे राज्यभर सभा घेऊन सांगत फिरणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा संवेदना कुठे गेल्या. ते संवेदनहीन आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

आदिवासी विकास मंत्री, गृहमंत्री या विषयावर बोलत नाही. प्रशासनावर शासनाचे वचक नाही, पिडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची तत्परता दाखविली नाही. मात्र ही घटना आम्हाला कळताच येथे येऊन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांचा माहितीवरून आता खऱ्या अर्थाने तपासाला दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, महिला जिल्हाध्यक्षा अश्‍विनी जोशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com