Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Vivek Kolhe : पवारसाहेबांसोबतचा प्रवास यादगार..; विवेक कोल्हेंच्या प्रतिक्रियेने भाजपचं टेन्शन वाढलं

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतून केलेला प्रवास यादगार, असा आहे. राजकीय आणि कौटुंबिक चर्चा झाल्या. काही गोष्टी वेळेनुसार उघडपणे बोलू", अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या भेटीवर 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विवेक कोल्हे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. बैठकीनंतर शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या वाहनातून एकत्र प्रवास केला. शरद पवार यांच्याबरोबर विवेक कोल्हे यांनी एकाच वाहनातून प्रवेश केल्याने राजकीय चर्चेला पेव फुटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमुळे अनेकांची अडचण झाली आहे. तशीच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या (BJP) माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची अडचण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आशुतोष काळे विद्यमान आमदार आहेच. त्यामुळे स्नेहलता कोल्हे यांनी वेगळी चाचपणी सुरू केली आहे.

यातच विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची पुणे येथे भेट घेत एकाच वाहनातून प्रवास केल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे. भाजपला अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसणार, असेच काहीचे वातावरण निर्माण झाले आहे. विवेक कोल्हे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली.

विवेक कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचा 'बॉस', असा उल्लेख केला. हा त्यांच्याविषयी आदर आहे. 'बॉस'ला प्रत्येकाच्या मनातील कळतं. त्यामुळे त्यांना काही सांगायची गरजच नाही. पण त्यांच्याबरोबर केलेला प्रवास हा यादगार ठरणारा आहे. राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चांबरोबर कौटुंबिक आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत कोल्हे परिवाराचे मोठे योगदान राहिले आहे, याची आठवण शरद पवार यांनी सांगितली, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी हातात घेणार का? यावर विवेक कोल्हे यांनी यावर संयम दाखवला. शरद पवार यांच्याबरोबर झालेला प्रवास यादगार ठरणारा आहे. राजकीय गोष्टींना टायमिंग साधायचा असतो, एवढीच प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT