Dashrath Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dashrath Patil Politics : दशरथ पाटील करणार नाशिकच्या रस्त्यांचे ऑडिट; हायकोर्टाने घेतली दखल

Nashik Mahanagarpalika : माजी महापौर दशरथ पाटील यांनी महापालिकेच्या कामकाजा विरोधात आवाज उठवला आहे. यासंदर्भात आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला खडसावले आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

Sampat Devgire

Dashrath Patil News: नाशिक महापालिकेवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. गेल्या काही कालावधीतील विविध कामांमुळे प्रशासनावर मोठी टीका होत आहे. विशेष करून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला खडसावले आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. यावर मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या आहेत.

यासंदर्भात माजी महापौर पाटील यांची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाकडून येणारा निधी शहरातील सुविधांवर खर्च होतो. महापालिका आणि राज्य शासनाचे विविध विभाग या निधीचा विनियोग करते.

या निधीचा उपयोग शहरातील जुन्या रस्त्यावरती किंवा भूसंपादनासाठी केला जातो. 2003 आणि 2015 या दोन्ही कुंभमेळ्यात या भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यासाठी साधूग्रामसाठी 54 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या सर्व सुविधा कायम स्वरुपी आणि टिकाऊ आहेत, असे असताना महापालिका आणि काही भ्रष्ट अधिकारी बांधकाम लॉबीला परवानगी देऊन मोठ्या इमारती बांधण्यासाठी परवानगी देत आहे. त्याने कुंभमेळ्याचे धार्मिक वैभव आणि सुविधांना बाधा पोहोचली आहे.

नाशिक शहरात नियमितपणे वाहतूककोंडी होत आहे, असे असताना त्यावर काय उपाययोजना केल्या? या चौकशीची मागणी पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेची सुनावणी नुकतीच झाली. यासंदर्भात महापालिकेला देखील लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकीत रस्त्यांचा मुद्दा गाजणार...?

माजी महापौर दशरथ पाटील यांनी यासंदर्भात थेट राज्य शासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. आगामी काळात आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

तसेच महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त कार्यरत असल्याने पालकमंत्री आणि राज्य शासनाचा कामकाजात थेट हस्तक्षेप होत आहे. अशा स्थितीत महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक(Nashik) शहरातील रस्ते हा मोठा राजकीय मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

माजी महापौरांच्या टार्गेटवर आयुक्त

माजी महापौर पाटील यांनी थेट महापालिका आयुक्त आणि महापालिका बांधकाम विभाग यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी नाशिक शहरातील स्मार्ट सिटी योजना,रस्त्यांच्या समस्यांवरुन प्रशासनाला धारेवर धरले आहेत. शहरात खड्ड्यांमुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत असल्याची अशी टीका पाटील यांनी याचिकेद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT