Balasaheb Thorat, Bhanudas Murkute, Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: उसाच्या 'पळवापळवी'वरून भानुदास मुरकुटेंनी टोचले थोरात - विखे पाटलांचे कान

Bhanudas Murkute On Thorat and Vikhe Patil : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्यावर टीका

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: येणाऱ्या गळीत हंगामासाठी साखर कारखानदार नेते मंडळी आतापासूनच कामाला लागली असून संपूर्ण गळीत हंगाम पूर्ण होईस्तोवर कारखान्याच्या हद्दीबाहेरील क्षेत्रावर नेत्यांचा डोळा असणार आहे. या पार्श्वभूमीवर सहकारी ऊस कारखनदारीत 'दादा' समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे या दिग्गज नेत्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी खास आपल्या भाषेत विनंती वजा कान टोचले आहेत.

'गणेश', 'अशोक', 'अगस्ती'सह अन्य कोणत्याच कारखान्याच्या कार्यक्षेञात अतिक्रमण न करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सद्बुद्धी साईबाबांनी दोघांनाही द्यावी, अशी मार्मिक टिपणी मुरकुटे यांनी केली. थोरात नगरचे माजी पालकमंञी होते, तर आता विखे पालकमंञी आहेत. या नात्याने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना समान न्याय देऊन पालकत्व करावे, असे आवाहन मुरकुटे यांनी केले.

थोरात यांनी नुकतेच, संगमनेर, संजीवनी कारखाना 'गणेश'चा ऊस नेणार नाहीत, तसेच प्रवरा कारखान्याने 'गणेश'चा ऊस नेवू नये, असे म्हटले. यावरुन संगमनेर व प्रवरा दोन्हीही कारखाने गणेश कारखान्याचा ऊस नेत होते आणि यामुळेच गणेश कारखाना अडचणीत आला हे सिध्द होते, असे म्हणत ऊस 'पळवापळवी'च्या मुद्याला हात घातला आहे.

संगमनेर व प्रवरा कारखाने हे स्वतःच्या कार्यक्षेञातील ऊस तसाच ठेवून गणेश, अशोक, अगस्ती यासह अन्य कारखान्यांनी मेहनतीने उसक्षेञवाढ केलेल्या उसावर डल्ला मारतात. स्वतःच्या कार्यक्षेञतील ऊस उशिरा तोडल्याने उसाच्या खोडक्या होतात, उत्पादन घटते, त्यामुळे प्रवरा व संगमनेर कारखाना कार्यक्षेञात उसाचे क्षेञ वाढत नाही आणि म्हणून त्यांना कार्यक्षेञाबाहेरील उसावर अवलंबून राहावे लागते.

ऊस पळविला ते कारखाने उसाअभावी अडचणीत येवून कमी ऊस गाळपामुळे आर्थिक अडचणीत सापडून आजारी पडतात. इतर कारखान्यांच्या कार्यक्षेञात आतिक्रमण करुन उसाची पळवापळवी करणारे विखे हे संगमनेर कारखान्याच्या तर व थोरात प्रवरा कारखान्याच्या कार्यक्षेञात माञ एकमेकांचा ऊस तोडीत नाहीत. यावरून या दोघांची मिलीभगत असल्याची टीका मुरकुटे यांनी केली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT