Unmesh Patil and Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unmesh Patil Vs Mangesh Chavan : ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांचं भाजपच्या मंगेश चव्हाणांच्या टीकेला जशास तसा पलटवार, म्हणाले...

Sampat Devgire

Chalisgaon BJP Vs Shivsena UBT News: शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने संतापलेल्या भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळे भाजपच्या या जुन्या माजी खासदार आणि आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान मिळावे यासाठी चाळीसगाव येथे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी खासदार पाटील यांनी राज्य शासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्याला उत्तर दिले.

या संदर्भात मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातून समाज माध्यमांवर खासदार उन्मेश पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. सरकारी पेन्शन घेणाऱ्या आणि हजारो रुपयांचे दुष्काळी अनुदान मिळवणाऱ्या पाटील यांचे हे आंदोलन स्वतःसाठी आहे. गरीब शेतकऱ्यांविषयी त्यांना काहीही कळवळा नाही असे त्यात म्हटले होते.

आमदार चव्हाण यांची टीका शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या जिव्हारी लागले. त्यांनीही चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. माजी खासदार पाटील यांनी भाजप आमदार चव्हाण यांचे अक्षरशा वाभाडे काढले. त्यामुळे दुष्काळी अनुदानासाठीचे हे आंदोलन चाळीसगावच्या स्थानिक राजकारणाला तडका देणारे ठरले.

या संदर्भात माजी खासदार पाटील यांनी आमदार चव्हाण यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सहकारी संस्थांचे भूखंड हडप करणे, गौण खनिजांची चोरी करणे किंवा याच्या त्याच्या नावाने सरकारी कंत्राटी घेऊन राज्य सरकारला लुटण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणे केव्हाही चांगले. लोकप्रतिनिधी म्हणून तो आमचा हक्क आहे. हजारो कोटीत खेळणाऱ्यांना गरीब शेतकऱ्यांचे दुःख कसे कळणार?.

या उत्तराने भाजप आमदार चव्हाण देखील चांगले संतापले आहेत. त्यामुळे आघाडी आगामी काळात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT