Nilesh Lanke : लंकेंना हवेत जिंकलेल्या पैजेचे पैसे; जगतापांवरून लावली होती पैज !

Nilesh Lanke Won the Bet From Rahul Jagtap : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार राहुल जगताप लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत थांबणार नाहीत. यावरून स्वकीय आणि विरोधकांबरोबरची पैज जिंकली असून, ते पैसे देत नसल्याची मिश्किल टिप्पणी खासदार नीलेश लंके यांनी केली.
Rahul Jagtap- Nilesh Lanke
Rahul Jagtap- Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke News : माजी आमदार राहुल जगताप यांच्याबाबत माझ्याशी स्वकीय आणि विरोधकांनी लावलेल्या पैजांचा किस्सा खासदार नीलेश लंके यांनी सांगितला. माजी आमदार राहुल जगताप माझ्यासाठी निवडणुकीत शेवटपर्यंत थांबणार नाहीत.

यावरून स्वकीय आणि विरोधकांनी माझ्याशी पैजा लावल्या. या पैजा मी जिंकल्या पण आज ते लोक पैजेचे पैसे देईनात, असे सांगत माजी आमदार राहुल जगताप यांचा माझ्या विजयात मोठा वाटा असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांचा नगर दक्षिण लोकसभेतील विजयाबद्दल श्रीगोंद्यातील देवदैठण येथे कार्यक्रम झाला. यावेळी ग्रंथतुला करण्यात आली. लोकांनी मोठ्या अपेक्षेने विजयी केले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अनेकांनी माझ्या विजयासाठी नवस केले, हे माझे भाग्य आहे.

माझ्या कातड्याचे जोडे करून लोकांना दिले तरी, यातून उतराई होऊ शकत नसल्याची भावना व्यक्त करत तालुक्यातील निकृष्ट रस्त्यांचा प्रश्नाबरोबर पाणी, वीज, शेतमालाला भाव आणि सरकारी योजनांचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत राहणार असल्याची भावना खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली.

Rahul Jagtap- Nilesh Lanke
Nilesh Lanke News : नगरमध्ये मोठं घडणार, लंकेंच्या प्रचारसभांचे विखेंनी मागवले व्हिडिओ; पुराव्यांची जुळवाजुळव?

माजी आमदार (MLA) राहुल जगताप यांनी मतदार संघातील रस्त्यांची दूरवस्थेसह अनेक कामे अपूर्ण आणि प्रलंबित ठेवल्याकडे लक्ष वेधले. देवदैठण इथल्या माझ्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले, तिथे वैद्यकीय अधिकारी नाही. आचारसंहिता संपताच हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राहुल जगताप यांनी नीलेश लंके यांच्याकडे केली.

Rahul Jagtap- Nilesh Lanke
Nilesh Lanke On Sujay Vikhe : 'विखे-गडाख 1991'च्या निवडणुकीचा दाखला दिला; खासदार लंकेंनी विखेंची 'परंपराच' काढली

खासदार लंके यांनी देवदैठणमधील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्याच्या मुद्यावर आपणच ते वैद्यकीय दवाखाना चालवू. मी गोळ्या लिहून देतो तुम्ही इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी करताच सभेत एकच हशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के होते .कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल लोखंडे, सरपंच संदीप तरटे, दूध संघाचे माजी अध्यक्ष सुरेश लोखंडे, अमोल वाघमारे, विजय कोकाटे, सुभाष वाघमारे उपस्थित होते.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com