Maharashtra Assembly Election 2024 : शिंदे शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी गद्दारी केली म्हणून माझी अपक्ष उमेदवारी, असल्याचे माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीला ठणकावत इशारा दिला आहे. नंदुरबार विधानसभेत भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध शिंदे शिवसेनेचा प्रचार सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते महायुतीसोबत आणि काँग्रेससोबत अधिक फिरत आहेत. म्हणून अक्कलकुवा विधानसभेत शिंदे सेनेच्या उमेदवाराविरुद्ध आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे डॉ. हिना गवित यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर डाब येथील देवमोगरा मातेचे दर्शन घेऊन आजपासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचेही गावित यांनी म्हटले आहे. (Heena Gavit) गावित यांच्या भूमिकेमुळे नंदुबारमधील महायुतीचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. राज्यात अनेक मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये वादावादी सुरू आहे. अनेक इच्छुकांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध बंड पुकारत अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांना धडकी भरली आहे.
वरिष्ठ नेत्यांकडून या बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत ते यशस्वी झाले तरच अधिकृत उमेदवारांचा जीव भांड्यात पडणार आहे. अन्यथा त्यांना विरोधकांसह स्वपक्षातील बंडखोरांशीही लढा द्यावा लागले, अशी परिस्थिती आहे. अर्थाच चार नोव्हेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतरच राज्यातील बंडखोरीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, हिना गावित यांनी आक्रमक पावित्रा घेत नंदुरबारमध्ये खळबळ उडवून दिली आहे. लोकसभेप्रमाणेच नंदुरबार (BJP) विधानसभेत शिंदे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते भाजपा चे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेस उमेदवारा सोबत पक्षाचे कमी पण शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते अधिक दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतही शिंदे शिवसेनेच्या नेत्यानी काँग्रेसचा प्रचार केला होता.
इतकंच काय तर त्यांचे ग्राउंड ही काँग्रेसच्या सभांसाठी दिले होते. 10 वर्ष खासदार असताना काँग्रेस व शिंदे सेनेच्या आमदारांपेक्षा आपण जास्त काम केले आहे, असा दावा करत या कामाच्या जोरावरच विजय प्राप्त करेन, असा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला आहे. तसेच डाब येथील देवमोगरा मातेच्या मंदिरात नारळ फोडून आज पासून प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे सांगत हिना गावित मैदानात उतरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.