Heena Gavit: लोकसभेतील पराभवाचा वचपा विधानसभेत काढणार; माजी खासदाराचा प्रचार सुरु

Akkalkuwa Akrani Assembly: पाडवी पिता-पुत्रांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी डॉ.हिना गावित यांनी कंबर कसली आहे. डॉ गावित यांच्या भूमिकेने शिंदे गटातील नेतेही धास्तावले आहेत.
MP Goval Padvi & Dr Heena Gavit
MP Goval Padvi & Dr Heena GavitSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News: लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी कंबर कसली आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांना पराभवाची धूळ चारली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्या ठिकाणी के सी पाडवी हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. खासदार गोवाल पाडवी हे आमदार के सी पाडवी यांचे पुत्र आहेत. भाजपच्या माजी खासदार डॉ.हिना गावित यादेखील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून इच्छुक आहेत.

दोन टर्म खासदार असलेल्या हीना गावित यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली. पाडवी पिता-पुत्रांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी डॉ.हिना गावित यांनी कंबर कसली आहे. डॉ गावित यांच्या भूमिकेने शिंदे गटातील नेतेही धास्तावले आहेत.

MP Goval Padvi & Dr Heena Gavit
Rohit Pawar: सत्ताधारी उमेदवारांना पहिला 'हप्ता' मिळाला? एक गाडी सापडली, अजून चार गाड्या कुठे आहेत?

अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात गेल्या महिन्याभरापासून त्या तळ ठोकून आहेत. या मतदारसंघात शिवसेना शिंदेगटाकडून इच्छुक विजयसिंग पराडके आणि किरसिंग वसावे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे डॉ. हिना गावित यांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी हे सलग ३५ वर्षांपासून अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com