Manikrao Kokate News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate News : राजाभाऊ वाजेंचा माणिकराव कोकाटेंना पुन्हा धक्का!

Sampat Devgire

Shivsena Vs NCP politics : राजकीयदृष्ट्या सिन्नर तालुका अत्यंत जागरूक आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटात तीव्र संघर्ष आहे. आज झालेल्या बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत वाजे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकाटे गटाला मोठा धक्का दिला. Manikrao Kokate News

सिन्नर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा आमदार माणिकराव कोकाटे गटाला मोठा धक्का दिला आहे.आमदार माणिकराव कोकाटे समर्थक बाजार समिती संचालक शशिकांत गाडे आणि नवनाथ नेहे यांचा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब गटात) प्रवेश झाला आहे. Shivsena politics

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिन्नर बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापतिपदाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी चुरस होती. मात्र, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार कोकाटे क्लीन बोल्ड झाले. या निवडणुकीत कोकाटे यांचे विश्वासू सहकारी आणि बाजार समितीचे संचालक नवनाथ नेहे आणि शशिकांत गाडे या दोन संचालकांनी ऐनवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकाटे गट अल्पमतात आला.

बाजार समितीच्या अतिशय वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये कोकाटे गट सोडलेल्या शशिकांत गाडे यांची बिनविरोध सभापतिपदी निवड झाली. कोकाटे गट अल्पमतात आल्याने सभापतिपदासाठी अर्ज भरलेले संजय खैरनार यांना माघार घ्यावी लागली.

बाजार समितीच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीत कोकाटे आणि वाजे घटाला समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी कोकाटे गटाचा एक संचालक वाजे गटाबरोबर आल्याने वाजे गटाचे रवींद्र पवार हे सभापती झाले होते. पवार अतिक्रमणामुळे अपात्र ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक झाली. वाजे गटांनी कोकाटे यांना पुन्हा धक्का देत बाजी मारली.

सिन्नरच्या राजकारणात बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. विशेषता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे हे दोघेही लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. कोकाटे यांना आपला गट सांभाळता आला नाही, तालुक्यातील राजकारणावर त्यांची पकड कमी होत चालल्याचे संकेत आहेत. कोकाटे यांचे अनेक निकटवर्तीय दुरावल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT