BJP Shirdi News : शिर्डीत भाजपची रणनीती ठरली; 'बूथ जिंका, निवडणूक जिंकू...'

BJP MP Sameer Orav : भाजपच्या बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, युवा वॉरियर्स, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व आघाड्यांचा मेळावा
MP Sameer Orav
MP Sameer OravSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, युवा वॉरियर्स, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपमध्ये सर्व आघाड्यांचा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आव्हान दिले आहे. या मेळाव्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande ) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार समीर ओराव यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil), माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रदेश महामंत्री विजय चौधरी (Vijay Choudhary, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Sameer Orav
Nashik Politics : दादा भुसेंनी लक्ष्य केलेल्या सुधाकर बडगुजरांवर ठाकरे गटात मोठी जबाबदारी

खासदार ओराव यांनी मार्गदर्शन करताना बूथ जिंकला, तर निवडणूक जिंकू, असा संदेश देत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक माणसाला आत्मनिर्भर करण्याचे काम करत आहेत. प्रत्येक माणसाला योजनारूपी आधार देत आहेत. देशातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनीच केले. काँग्रेसने (Congress) आदिवासी समाजाच्या राजकारणासाठी वापर करून घेतला, असादेखील आरोप खासदार ओराव यांनी केला.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा केंद्र सरकारने सुरू केलेल्या 83 योजना लोकांपर्यंत पोहोचवा. योजनेचा लाभ मिळाला की नाही, याचा तपास घ्या. आपल्याकडे आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी शंभर दिवस राहिले आहेत. त्यामुळे कामाला लागा, असे सांगितले.

दरम्यान, भाजपने शिर्डी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath-Shinde) गटाच्या अडचणी वाढवल्या आहेत. भाजप महायुतीकडून शिर्डी मतदारसंघ मिळावा, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. विखे यांची या मतदारसंघावर पकड असल्याने भाजप (BJP) हा मतदारसंघ मागवून घेऊ शकतो. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तसेच महाविकास आघाडीमध्येदेखील शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी कोणात लढत होणार, याकडे लक्ष लागले आहे.

R

MP Sameer Orav
Police Transfer News : निवडणूक आयोगाचा दणका; 59 पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com