Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Market Committee Election : नगर बाजार समितीत प्रत्येक शेतकऱ्याला मोफत नाश्ता : नीलेश लंकेंची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : नगर (Nagar) बाजार समितीत (Bazar Samiti) येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत नाश्ता देण्याची आज मी घोषणा करतो. बाजार समितीने शब्द पाळला नाही, तर हा नीलेश लंके तुम्हाला कुठूनही आणून नाश्ता देईल असा शब्द देतो, असे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जाहीर सभेत सांगितले. (Free breakfast to every farmer in Nagar Bazar Samiti : Nilesh Lanke's announcement)

माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके (नगर तालुका) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्या सभेत लंके बोलत होते. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख (नगर दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार हे उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले की, आमची यंत्रणा रात्री बारानंतर चालू होते. नगर तालुक्यातील लोकांना आम्ही रात्री दोननंतर पहाटे पाच वाजेपर्यंत घेऊन बसतोय. तेच लोक दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला त्यांच्याबरोबर (विरोधकांबरोबर) फिरतात. यंत्रणा सगळ्याकडे टाईट लावून ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. ‘ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’

नगर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची वज्रमूठ एकत्र बसली आहे, त्यामुळे नगर तालुक्यात परिर्वतन झाल्याशिवाय राहणार नाही. सभेला आलेल्या लोकांची उपस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या या विश्वासामुळेच महाविकास आघाडीचे पॅनेल पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून विरोधकांचा पराभव करण्यासाठी सज्ज झालेले आहे, असेही आमदार लंके यांनी नमूद केले.

नीलेश लंके म्हणाले की, सध्याच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांमुळे बाजार समितीच्या कारभारावरील शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. पारदर्शी व्यवहार करत शेतकऱ्यांचा विश्वास कमावणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT