Mahadik Vs Patil : बंटी पाटलांना आमदार केलं, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक झाली : महादेवराव महाडिकांची जाहीर कबुली

माझा पुतण्या मुन्नाला मी संधी दिली नाही. पण बंटी पाटील यांना संधी दिली.
 Bunty Patil-Mahadevrao Mahadik
Bunty Patil-Mahadevrao MahadikSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांना पहिल्यांदा आमदार कोणी केलं असेल तर या महादेवराव महाडिकांनी केलं आहे. आयुष्यातील सर्वांत मोठी ती चूक केली आहे, अशी कबुली माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevarao Mahadik) यांनी कोल्हापुरात दिली. (Making Bunty Patil MLA was biggest mistake of my life : Mahadevarao Mahadik)

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील महाडिक यांच्या छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ आज (ता. १४ एप्रिल) करण्यात आला. त्यावेळी महादेवराव महाडिक यांनी ही खंत बोलून दाखवली.

 Bunty Patil-Mahadevrao Mahadik
Kolhapur News : ‘बंटी पाटील, बिंदू चौकात तुमची साडेसात वाजता वाट बघतोय, नक्की या...’ : महाडिकाचं सतेज पाटलांना चॅलेंज

महादेवराव महाडिक म्हणाले की, सर्वजण येऊन माझ्या घरात डोकं टेकून बसले होते. माझा पुतण्या मुन्नाला मी संधी दिली नाही. पण बंटी पाटील यांना संधी दिली. मी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे मी शब्द पाळण्यासाठी मुन्नाऐवजी बंटी पाटील यांना आमदारकीची संधी दिली. मी त्यावेळी सर्वांना सांगितलं की मी पाटलाला शब्द दिला आहे, त्यामुळे मला ते करावं लागणार आहे. पण, मागंपुढं थोडं वजावट आहे. आणखी हिम्मत आहे, मी आणखी दहा-पंधरा वर्षे लढणार आहे, पोरांनो. त्यामुळे काही काळजी करू नका.

 Bunty Patil-Mahadevrao Mahadik
BJP NEWS : भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप : ‘हे तर ४० टक्के कमिशन एजंट...’ , प्रतिमेला मारले जोडे

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काय होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. प्रत्येक सभासदाला माहिती आहे की आपण काय करतो. आपली ताकद किती आहे आणि आपलं काम किती आहे. या निवडणुकीत चांगली परिस्थिती असतानासुद्धा प्रत्येक सभासदाला सांष्टाग नमस्कार करून मत मागतो. कारण, हा सभासद कारखान्याचा मालक आहे. कारखान्याचा कारभार हा आठ वर्षांनी लागत आहे. या आठ वर्षांत कारखान्याचे काम स्वच्छ पारदर्शीपणे करत आहोत. सध्या हा कारखाना चार हजार मेट्रीक टनाने चालवत आहोत, असेही महाडिक यांनी नमूद केले.

 Bunty Patil-Mahadevrao Mahadik
Karnataka Election : भाजपच्या आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला : नाराजांची संख्या वाढली

पंचगंगा नदीत दूषित पाणी सोडलं जातं म्हणून राजाराम सहकारी साखर कारखान्याची वीज तोडली. मात्र, आम्ही बाहेरून कनेक्शन घेऊन यंदाचं गाळप पूर्ण केले. पण, माणसानं किती वाईट करावं, याला काय मर्यादा आहेत की नाही. हा राजाराम कारखाना अवघ्या पाच रुपये किलो सभासदांना साखर देतो. सभासदांशी आमचं घरच्या माणसासारखं नातं जोडलेले आहे. महाडिकांना काही लागत नाही, माझं तर नाव महादेव आहे, नुसती उदबत्ती लावली की मी प्रसन्न होतो. विरोधकांनी फार गडबड करू नये, असे आव्हान महादेवराव महाडिकांनी दिले.

ते म्हणाले की, जनतेने आजपर्यंत महाडिकांना साथ दिली आहे. महाडिक आजही रेसला पळू शकतात, तुम्ही काही काळजी करू नका. महाडिक कधीही संपणार नाहीत. विरोधक संपतील, दहावेळा. माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com