Prafull Patel-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Prafull Patel-Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य उज्वल वाटत नाही : प्रफुल्ल पटेलांनी डागली तोफ

सरकारनामा ब्यूरो

महेश माळवे

श्रीरामपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेलेले आमदार व अपक्षांत चकमकी होत आहेत. सध्याच्या राज्य सरकारमध्ये आलबेल नाही, त्यामुळे राज्य सरकारचे भवितव्य उज्वल वाटत नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी केले. (Future of the Shinde-Fadnavis government does not look bright : Prafull Patel)

शिर्डी येथील राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या मेळाव्यानंतर प्रफुल्ल पटेल पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पक्षातील कार्यकर्त्यांना दिशा देणे महत्त्वाचे असते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते धोरण असल्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे. राज्यात उद्योग धंद्याबाबत अनेक गोष्टी घडल्या. वेदांत फॉक्स कॉन व टाटा एअरबस प्रकल्प राज्यात उभारला जाणार होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूर जवळील मियान येथे प्रकल्प उभारण्यात असल्याची घोषणा केली होती, तरीही तो प्रकल्प गुजरातला गेला, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, भाजपशी संघर्ष करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये एकत्र येऊन निवडणूक लढवली असती तर निकाल काही वेगळाच असला असता. महाविकास आघाडीचा प्रयोग गुजरातमध्ये होऊ शकत नाही; कारण शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवत नाही. गुजरातमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात खरा कार्यक्रम कोणाचा होणार हे २०२४ मध्ये कळेल. जे घडले ते महाराष्ट्रातील अनेक लोकांना आवडले नाही. मी केंद्रात मंत्री असताना विमानतळ राज्य सरकारकडे वर्ग केले. या विमानतळावर टाटाचा प्रकल्प आणण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकार दोघांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी भारत जोडो यात्रेत जोडले जाणार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे राज्यातील काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आले होते, त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीने सहभागी होण्याची विनंती केली. त्या विनंतीला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे या यात्रेचे राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात येईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT