BJP Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vivek Kolhe : आम्ही सत्ताधारी पक्षात असलो, तरी..; विवेक कोल्हेंची खदखद

Ganesh Sugar Factory Grinding Season Begins in Rahata in Presence of BJP Leader Vivek Kolhe : गणेश कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ महंत रामगिरी महाराज व साकुरी इथले सद्‍गुरू उपासनी संस्थानातील कन्यांच्या हस्ते करण्यात आला.

Pradeep Pendhare

Ganesh Sugar Factory Rahata : 'आम्ही सत्ताधारी पक्षात असलो, तरी सत्तेत नाही. ‘गणेश’च्या माध्यमातून आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र कुणी राजकारणातून अडचणी निर्माण करत असेल, तर त्यांना राजकीय पद्धतीनेच उत्तर देऊ. विरोधकांनी आमची रेषा छोटी करण्याच्या प्रयत्न करण्याऐवजी स्वतःची रेषा मोठी करावी.

मागील दोन गळीत हंगामांप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी करू. चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देऊ,' असे प्रतिपादन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक विवेक कोल्हे यांनी केले

गणेश कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ मंहत रामगिरी महाराज व साकुरी इथल्या सद्‍गुरू उपासनी संस्थानातील कन्यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, सचिव नितीन भोसले, संगमनेर (Sangamner) सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, एकनाथ गोंदकर, ॲड. नारायण कार्ले, शिवाजीराव लहारे, गंगाधर चौधरी, धनंजय गाडेकर यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ, कामगार व सभासद उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘गणेश’ला 75 कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळवून दिले. त्यातून कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता तीन हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविली. कामगारांची दहा कोटी रुपयांची थकीत देणी दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबतीने कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे."

यंदा कारखान्याचा आसवनी प्रकल्प सुरू केला जाईल. 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतीकडे लक्ष देऊन एकरी उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. उसावर एकरी सत्तर हजार रुपये खर्च केले, तर उत्पादन नक्की वाढेल. मात्र तसे होताना दिसत नाही. ऊसाचे बेणे देण्याची कारखान्याची तयारी आहे. मत्स्य शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावा. त्यासाठी सहकार्य करण्याची आपली तयारी आहे, असे विवेक कोल्हे यांनी म्हटले.

विरोधकांच्या उद्योगावर घणाघात

गणेश कारखान्याची अडवणूक करण्यासाठी विरोधकांनी जिल्हा सहकारी बँक आणि संचालक मंडळाला न्यायालयात दावा दाखल करून नोटिसा बजावल्या. कारखाना ही या परिसरातील शेतकरी आणि कामगारांची कामधेून आहे. येत्या चार तारखेला उच्च न्यायालयात एका दाव्याची सुनावणी आहे. विरोधकांनी गणेशच्या हितासाठी हा दावा मागे घेतला, तर आपण त्याचे स्वागत करू, असेही विवेक कोल्हे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT