Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan: आदिवासींनी आता शिक्षणावर भर द्यावा

Sampat Devgire

चाळीसगाव : आदिवासी जमातीने (Trible community) व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. आपल्या पाल्याला शिक्षणाकडे (Education) वळवायला हवे, तरच समाजाला प्रगती पथावर मार्गक्रमण करता येईल असे प्रतिपादन ग्रामविकास (Rural devolopment) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. (Minister Girish Mahajan guides Trible community rally)

तंट्या तात्या भील यांच्या जयंतीनिमित्त येथे झालेल्या एकलव्य संघटनेच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या मैदानावर रविवारी दोनच्या सुमारास एकलव्य संघटनेतर्फे तंट्या तात्या भील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. श्री. महाजन यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, अमोल शिंदे यांच्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

समाजातर्फे पवनराजे यांनी यावल येथे आदिवासी प्रकल्पाच्या धर्तीवर भडगाव येथे देखील एक प्रकल्प करावा, जेणेकरून समाज बांधवांची गैरसोय दूर होईल अशी मागणी केली. त्यावर लवकरच सकारात्मक चर्चा करण्यासाठी पदाधिकारी घेऊन मुंबई येथे यावे असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

श्री. महाजन यांनी आदिवासी समाजाने व्यसनापासून लांब राहण्याचे आवाहन केले. शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे असे सांगताना समाजाच्या प्रगतीसाठी ते गरजेचे आहे असे संगितले. योगेश पाटील यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT