तर तीन वर्षांच्या नातीसह संपूर्ण कुटूंब आत्महत्या करु ; एम.के. मढवींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Shinde group एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या काही दिवसांपासून मेगाभरती सुरु असल्याचे दिसत आहेत.
तर तीन वर्षांच्या नातीसह संपूर्ण कुटूंब आत्महत्या करु ; एम.के. मढवींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

नवी मुंबई : एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या काही दिवसांपासून मेगाभरती सुरु असल्याचे दिसत आहेत. कालच वरळीतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी झाले. असे असताना मात्र नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम. के मढवी यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. 

गेल्या २ महिन्यापासून शिंदे गटात सामील होण्यासाठी शिंदे गटाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप मढवी यांनी केला आहे. तुम्ही मातोश्रीवर जाऊ नका, माझ्याकडे आलात तर तुमचं, तुमच्या कुटूंबियांचं आणि कार्यकर्त्यांचं नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या, असं मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे.

तर तीन वर्षांच्या नातीसह संपूर्ण कुटूंब आत्महत्या करु ; एम.के. मढवींचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Mulayam Singh Yadav : मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक ; ऑक्सिजन पातळी, रक्तदाब खालावला

तर नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही मला शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी दिली असून १० लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपारीची कारवाई करण्याची नोटीसही दिल्याचा आरोपही माजी नगरसेवक एम. के मढवी यांनी केला आहे. त्यामुळे माझ्यावर मानसिक दडपण आल्याचं त्यानी म्हटलं आहे.

पण जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी, माझं कुटुंब, साडेतीन वर्षाची नात, २ मुले, सुन, पत्नीसह आत्महत्या करू. माझ्या आणि माझ्या कुटूंबियांच्या जीवाला कमी जास्त झालं तर त्याला विवेक पानसरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीप नाईक, विजय चौगुले जबाबदार असतील असा इशारा एम. के मढवी यांनी दिला आहे. 

संपूर्ण प्रकारावर शिवसेना खासदार राजन विचारे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ ही गंभीर बाब आहे. याबाबत मी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. प्रत्येक शिवसैनिकाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून त्रास दिला जात आहे. जनता हे सर्व उघड्या डोळ्याने बघ आहे. असं राजन विचारे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com