Girish Mahajan | unmesh patil sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी उन्मेष पाटलांवर डागली तोफ; म्हणाले, "मित्राला बळीचा बकरा केला अन्..."

Akshay Sabale

Jalgaon News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ ( Smita Wagh ) यांना मीच तिकीट नाकारलं होतं. मला विजयाबाबत थोडी शंका होती, अशी कबुली भाजपच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

2019 मध्ये ज्यांना तिकीट मिळालं, त्यांना तब्बल पाच लाखांच्या मताधिक्यानं निवडून आणलं. पण, यंदा उमेदवारी मिळाली नसल्यानं ते दुसऱ्या पक्षात गेले आणि मित्राला बळीचा बकरा केला, असा म्हणत महाजन यांनी उन्मेष पाटील ( Unmesh Patil ) यांच्यावर निशाणा साधला.

गिरीश महाजन ( Girish Mahajan ) म्हणाले, "2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांना मीच तिकीट नाकारलं होतं. मला विजयाबाबत थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. ज्यांना तिकीट मिळालं त्यांना पाच लाखांच्या मताधिक्यानं निवडून आणलं. मात्र, यावेळी उमेदवारी मिळाली नसल्यानं ते दुसऱ्या पक्षात गेले आणि मित्राला बळीचा बकरा केला. पण, या निवडणुकीत अनेक लोकांचा माज उतरला आहे."

यावेळी गिरीश महाजन यांनी पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला आहे. "माझी पहिलीच विधानसभा निवडणूक होती. माझ्या विरोधात शरद पवार यांचे विश्वासू ईश्वरलाल जैन उभे होते. तेव्हा, प्रमोद महाजन यांनी मला निवडणूक लढायला सांगितलं. मी लढणार नसल्याचं महाजन यांना कळवलं. पण, त्यांनी लढावं लागेल आणि तू जिंकणार असल्याचं मला म्हटलं. मी त्यांना सांगितलं, माझ्या खिशात पाच हजार रूपये नाही, कसे निवडणूक लढू. त्यावेळी महाजन मला म्हणाले की, तू काही कर वर्गणी गोळा कर... भिक माग.. तेव्हा पाच-साडेपाच लाख रूपये वर्गणी गोळा झाली. मी निवडणूक लढलो. या निवडणुकीत 14 हजार मतांनी निवडून आलो. तेव्हापासून आजपर्यंत कधी मागे वळून पाहिलं नाही," " असं महाजन यांनी म्हटलं.

"जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्यानं जिंकू. याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. गेल्यावेळी दोन जागा कमी आल्या. कारण, आपलेच घरभेदी होते. त्यामुळे ते घडलं," असं म्हणत महाजन यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांना लक्ष्य केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT