Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan News : मतदानाआधीच गिरीश महाजन दोन जागा जिंकले!

Sampat Devgire

Jamner APMC election news : जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. त्यात महाजन यांच्या पॅनेलला मतदानाआधीच दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे माघारीनंतर पॅनलचे उमेदवार निश्चित होऊन भाजप आणि महाविकास आघाडीत सरळ लढतीचे चित्र आहे. (Straight fight in Jamner APMC in BJP & Mahavikas Aghadi)

या निवडणुकीत (Election) भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी एकत्र येत भाजपला आव्हान दिले आहे.

त्यात १५ वर्षांची गिरीश महाजन यांची सत्ता ताब्यात घेण्यासाठी आडाखे बांधले जात आहेत. दरम्यान, भाजपचा आधीच १८ पैकी एक उमेदवार (तुकाराम निकम - हमाल मापारी मतदारसंघ) बिनविरोध निवडला गेला आहे, तर व्यापारी मतदारसंघातून दोन उमेदवार देण्याच्या ठिकाणी आघाडीला एकच उमेदवार मिळाल्याने आणखी एक जागा आपोआपच भाजप आपल्या पदरात पाडून घेणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता फक्त १६ जागांवरच निवडणूक होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीचे उमेदवार असे, ज्ञानेश्वर पाटील, प्रमिलाबाई पाटील, कविता भगत, शैलेश पाटील, युवराज पाटील, योगेश बनकर, चरणदास पवार, अॅड. ज्ञानेश्वर बोरसे, शिवाजी पाटील, धोंडू पाटील, अॅड. राजू मोगरे, किशोर पाटील, सीताराम इंगळे, मयूर पाटील, रघुनाथ पाटील, अमोल पाटील आहेत.

सत्ताधारी भाजपच्या पॅनेलचे उमेदवार असे, धनराज चव्हाण, तुकडुदास नाईक, सुभाष पाटील, शिवाजी पाटील, सुभाष शिनगारे, पदमाकर पाटील, महेश देशमुख, राजमल भागवत, अशोक पाटील, दिलीप गायकवाड, वासुदेव घोंगडे, चंद्रशेखर काळे, सुनील कलाल, संगीताबाई पाटील, उज्ज्वलाबाई वाघोडे, अशोक भोईटे, संजय देशमुख निवडणुकीच्या मैदानात आहेत.

भाजपच्या पॅनलचे नेतृत्व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन करीत आहेत. स्वतः महाजन यांसह त्यांचे विश्वासू पदाधिकारी-कार्यकर्ते निवडणुकीचे नियोजन करीत आहेत. महाविकास आघाडीची धुरा संजय गरूड, डी. के. पाटील, अॅड. बोरसे, किशोर पाटील, विलास राजपूत आदींकडे आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून बाजार समितीची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. यावेळी आघाडीकडून संस्था ताब्यात घेण्यासाठी कोणते डावपेच आखले जातात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT