Sinner APMC news : आमदार माणिकराव कोकाटेंना धक्का, बाळासाहेब वाघ वाजेंबरोबर!

सिन्नर बाजार समितीत पॅनल निर्मितीतून कोकाटे गटात मोठी फूट पडली.
Rajabhau Wagh, Balasaheb Wagh & Manikrao Kokate
Rajabhau Wagh, Balasaheb Wagh & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनल करताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना आज मोठा धक्का बसला. त्यांचे खंदे समर्थक व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी त्यांची साथ सोडली. त्यांनी शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटात गेल्याने खळबळ उडाली. (NCP taluka chief joins Shivsena panel in Sinner)

सिन्नर (Sinnar) बाजार समिती निवडणुकीत (APMC election) आज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. पॅनेल निर्मितीत विलंब झाल्याने अनेकांना माघार घेता आली नाही. आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पॅनेल केले मात्र राष्ट्रवादीचे (NCP) तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाशी सख्य केले.

Rajabhau Wagh, Balasaheb Wagh & Manikrao Kokate
Chhagan Bhujbal Panel In Yeola: शिवसेनेला सोबत घेत भुजबळांचे पॅनल जाहीर!

आमदार कोकाटे गटाच्या पॅनेल निर्मिती व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ हे आघाडीवर होते. गेले काही दिवस सुरु असलेल्या प्रचारातही त्यांचा पुढाकार होता. मात्र आज पॅनल निर्मितीच्या चर्चेत आमदार कोकाटे यांनी काही नावे रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर काही कार्यकर्ते नाराज झाले.

यासंदर्भात श्री. वाघ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आमदार कोकाटे यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद झाले. त्यावरून नाराज झालेले श्री. वाघ कोकाटे यांना सोडून निघून गेले. त्यांना घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व कोकाटे यांचे कट्टर विरोधक वाजे यांचे समर्थक उदय सांगळे स्वतः आले होते. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला नाट्यमय वळण मिळाले.

Rajabhau Wagh, Balasaheb Wagh & Manikrao Kokate
Nashik APMC Election: पिंगळे समर्थकांच्या सात संस्था मतदानास अपात्र!

दरम्यान याबाबत श्री. वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण आमदार कोकाटे यांच्याबरोबर होतो. सध्या मात्र वाजे गटाबरोबर आहोत. पॅनल निर्मितीची बैठक सुरु आहे. त्यामुळे तुर्त काहीही सांगू शकत नाही. काही वेळातच आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com