Girish Mahajan, Jamner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांचे उत्पन्न लाखांवरून पोचले कोटीत!

Girish Mahajan Income Soars From Lakhs to Crores: जामनेर मतदार संघात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सातव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Sampat Devgire

Jamner Vidhan Sabha: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्या मालमत्तेचे विवरण असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात महाजन यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.

मंत्री गिरीष महाजन यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाला सादर केलेल्या विवरण पत्रात 2020 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ४५.५२ लाख रुपये होते. हे उत्पन्न यंदा २.१९ कोटी रुपये झाले आहे.

मंत्री महाजन यांच्या पत्नी देखील आयकर विवरणपत्र दाखल करतात. त्यांनी २०२० मध्ये आपले उत्पन्न ४.०९ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. सध्या ते १५.३४ लाख रुपये झाले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मंत्री महाजन यांच्या पत्नीच्या उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

मंत्री गिरीश महाजन यांचे शिक्षण जळगाव येथे झाले आहे. त्यांचे शिक्षण बारावी नंतर एस. वाय. बी. एससी. पर्यंत झाले आहे. त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले नाही.

भाजप नेते मंत्री महाजन यांच्याकडे ९.२८ लाख रुपये आणि पत्नीकडे २.०२ लाखांची रोकड आहे. याशिवाय मंत्री महाजन यांच्या विविध बँकांमध्ये १९.२५ आणि पत्नीच्या १४.५५लाख रुपये जमा आहेत. विविध बँकांकडे असलेल्या एकूण जमा आणि ठेवी ४७.३२ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मंत्री महाजन आणि त्यांच्या पत्नीकडे ८५० ग्राम सोने आणि चांदी असून त्यांचे एकत्रित मूल्य २.१२ कोटी रुपये आहे. त्यांना त्यांच्या मामांनी जळगाव येथे मामाने घर बक्षीस दिले आहे. संपत्तीच्या विवरणपत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे.

याशिवाय त्यांच्या विविध ठिकाणी शेत जमिनी तसेच वाणिज्यीक उपयोगाच्या जमिनी आहेत. त्यात देवपिंपरी (जामनेर), मेहरून (जळगाव) आणि पळसखेड बुद्रुक तसेच वाकी येथे त्यांच्या शेतजमिनी आहेत. याशिवाय त्यांचा अंधेरी येथे एक फ्लॅट देखील आहे. स्वतः महाजन आणि पत्नी या दोघांकडेही दोन पिस्तूल आहेत.

मंत्री महाजन यांची जंगम मालमत्ता ५.६८ कोटी रुपयांची आहे. स्थावर मालमत्ता ४५ कोटींची तर त्यांच्यावर १.२२ कोटी रुपयांचे आणि पत्नी यांच्याकडे 22.52 लाखांची देणी आहेत. प्राप्तीकर विभागाला सादर केलेल्या त्यांच्या विवरणपत्रात गेल्या ५ वर्षात सातत्याने वाढ होत गेली आहे. विशेषतः २०२० च्या तुलनेत यंदा त्यांचे उत्पन्न सहा पटीने वाढले आहे, हे उल्लेखनीय म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT