Mahayuti News : महायुतीमधील शिवसेनेचा अन् राष्ट्रवादीचा उमेदवार 'या' मतदारसंघात एकमेकांविरोधात भिडणार? माघारीकडे लक्ष

Shiv Sena vs NCP in Mahayuti : जाणून घ्या, नेमका कोणता आहे मतदारसंघ? उमेदवारांनी 'AB' फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरल्याने पेच वाढला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Shrirampur Constituency News : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीमध्ये पेच निर्माण झाला. महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी 'AB' फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरले.

काँग्रेसकडून ऐनवेळी उमेदवारीचे तिकीट कापलेले आमदार लहू कानडे यांनी महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीरामपूरच्या मैदानात एन्ट्री घेतली. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 'AB' फॉर्म घेत आज उमेदवारी अर्ज भरला. यातच महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 'AB' फॉर्म दिला. कांबळे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आमदार कानडे आणि माजी आमदार कांबळे यांच्या उमेदवारीचा महायुतीत पेच असतानाच, शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत राजकीय 'ट्विस्ट'चा धमका सुरू झालाआहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Abhijeet Bichukale : बारामतीत काका - पुतण्याच्या राजकीय लढाईत, आता अभिजीत बिचुकलेंनीही घेतली उडी!

महाविकास आघाडीने एकमताने काँग्रेस (Congress) पक्षाचा उमेदवार दिला. युवा नेते हेमंत ओगले मविआकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. महायुतीमध्ये मात्र उमेदवारी कोणी करायची याचा तिढा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुटलेला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी सोमवारी सकाळी आमदार लहू कानडे यांनी महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

असे मिळवले 'AB' फॉर्म -

राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी स्वतः आमदार कानडे यांच्यासाठी 'AB' फॉर्म आणला होता. तर सायंकाळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'AB' फॉर्म आणून अर्ज दाखल केला. अशातच शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या तिघांपैकी कोण दोघे मागे घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Mahayuti News : सिंदखेडराजामध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांमध्ये आपसातच जुंपली!

'मनसे','वंचित','जनस्वराज' अन् 'तिसऱ्या आघाडी' -

यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले पक्षाला सोडचिठ्ठी देत 'मनसे'कडून राजाभाऊ कापसे, 'वंचित'कडून अण्णासाहेब मोहन, 'जनस्वराज'कडून जितेंद्र तोरणे, 'तिसऱ्या आघाडी'कडून दीपक त्रिभुवन आदींसह सुमारे 51 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत.

उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज -

आकाश सुरेश शेंडे (बसपा), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (एकनाथ शिंदे शिवसेना), आमदार लहू कानडे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस), राजू नाथा कापसे (मनसे), जितेंद्र अशोक तोरणे (महाराष्ट्र स्वराज्य), सूर्यकांत विश्वनाथ आंबडकर (राष्ट्रीय समाज), हेमंत ओगले (काँग्रेस), राजेंद्र दत्तात्रय आव्हाड (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष), माजी खासदार सदाशिव लोखंडे (अपक्ष), संजय परसराम छत्तीसे, सुभाषदादा त्रिभुवन, अर्जुन सुदाम शेजवळ, चेतना प्रवीण बनकर, प्रकाश मार्शल संसारे, संजय विष्णू साठे , विजयराव गोविंदराव खाजेकर, सुरेश एकनाथ जगधने.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com